शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 07:11 IST

Ahmedabad Air India Plane Crash: मी माझ्या डोळ्यासमोर लोकांना मरताना पाहिले. खरेतर अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु त्या लोकांच्या बाजूला वसतिगृहाची भिंत होती. मात्र, मी जेथे बसलो तेथे थोडीशी जागा होती. त्यामुळे मी बचावलो. मला मात्र मी जिवंत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.

अहमदाबाद : विमान अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश यांनी आपण बचावल्याचा थरारक अनुभव सांगितला.त्यांनी सांगितले की, त्यांची सीट ११ए ही दुर्दैवी विमानाच्या डाव्या बाजूला आपत्कालीन दरवाजाजवळ होती. अपघात झाल्यानंतर विमानाचा भाग वसतिगृहावर पडला. विमानाचा दरवाजा तुटलेला पाहून एका क्षणात मनात विचार आला की, मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर मी विमानातून बाहेर पडलो, असे मूळचे दीवचे असलेले ब्रिटिश व्यावसायिक रमेश म्हणाले.

अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु बाजूला...रमेश म्हणाले की, मी माझ्या डोळ्यासमोर लोकांना मरताना पाहिले. खरेतर अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु त्या लोकांच्या बाजूला वसतिगृहाची भिंत होती. मात्र, मी जेथे बसलो तेथे थोडीशी जागा होती. त्यामुळे मी बचावलो. मला मात्र मी जिवंत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.मी विमानाच्या त्या भागातून बाहेर पडण्यात यशस्वी झालो, परंतु विमानाला आग लागल्याने माझा डावा हात भाजून निघाला. मी विमानातून बाहेर पडल्यावर एका रुग्णवाहिकेतून मला रुग्णालयात नेण्यात आले.व्हायरल व्हिडीओत जखमी झालेले रमेश रुग्णवाहिकेकडे चालत जाताना दिसत आहेत. ते म्हणाले की, अपघात होताच मला वाटले की, मी मरणार आहे. पण जेव्हा डोळे उघडले, तेव्हा मी जिवंत होतो. मी स्वत:ची सीटवरून सुटका करून घेतली आणि उघड्या जागेतून बाहेर पडलो.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद