शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:09 IST

रेनेने वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे इ-मेल पाठवले होते.

प्रेमात नकार मिळालेल्या एक तरुणीने बदला घेण्यासाठी असे काही कृत्य केले की, दिल्ली सह 12 राज्यांचे पोलीस, गुप्तचर संस्था आणि शेकडो सुरक्षा कर्मचारी कामाला लागले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमसह १२ राज्यांमध्ये २१ हून अधिक वेळा, बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्याबद्दल पोलिसांनी चेन्नईतील रेने जोशिल्दा या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी रोबोटिक्समध्ये प्रशिक्षित अभियंता आहे आणि चेन्नईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करते. नुकतेच, एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर, तिने तिच्या 'प्रियकर'ला अडकवण्यासाठी, त्याच्या नावाने, एक ईमेल करून, आपणच हे विमान पाडले, असे म्हटले होते.

नेमकं प्रकरण काय? -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेने तिचा सहकारी असलेल्या दिविज प्रभाकरच्या एकतर्फी प्रेमात पडली, मात्र फेब्रुवारी महिन्यात प्रभाकरने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. यामुळे रेने सूडबुद्धीने पेटली होती. तिने प्रभाकरच्या नावाने अनेक ईमेल आयडी तयार केले आणि बॉम्बसंदर्भात खोटी माहिती असलेले ईमेल पाठवण्यास सुरुवात केली. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कुशल असल्याने, तिने पोलिसांपासून वाचण्यासाठी डार्क वेब आणि व्हर्च्युअल आयडीचा कौशल्यपूर्वक वापर केला. मात्र, अखेर पोलिसांनी तिला शोधलेच. 

एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्यानंतर म्हणाली, ताकत समजली? -एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातानंतर, रेनेने बी. जे. मेडिकल कॉलेजला ई-मेल पाठवून, आता तुम्हाला ताकद समजली असेलच. जसे की, काल ई-मेल केला होता. आज एअर इंडियाचे विमान क्रॅश करवण्यात आले. आपल्याला माहीत आहे की, पोलिसांनी बनावट धमकी समजून याकडे दुर्लक्ष केले असेल. शाब्बास पायलट. आता आपल्याला समजले असेल, आम्ही खेळत नव्हतो.

मे ते जून दरम्यान पाठवले होते धमक्यांचे मेल -रेनेने वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे इ-मेल पाठवले होते. हे सर्व ई-मेल जून 2025 पर्यंत पाठवण्यात आले होते.