शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:17 IST

Ahmedabad Plane Crash Updates: मलबा हटवताना आणखी एक मृतदेह शनिवारी सापडल्याने एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७०वर पोहोचला.

अहमदाबाद : मलबा हटवताना आणखी एक मृतदेह शनिवारी सापडल्याने एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७०वर पोहोचला. सर्व मृतदेह अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. या भीषण विमान अपघातामागची कारणे शोधण्यासाठी व भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती केंद्र सरकारने स्थापन केली आहे. 

अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डेप्युटी सिव्हील सुपरिंटेंडंट रजनीश पटेल यांनी सांगितले की, आतापर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने तपासलेले आहेत, त्यापैकी ११ मृतदेहांचे डीएनए जुळले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्रीय गृहसचिवांची चौकशी समिती ३ महिन्यांत अहवाल सादर करेल. बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलमधून मलबा काढताना, विमानाच्या शेपटीत (मागील भागात) एक मृतदेह अडकलेला दिसला. त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. हा मृतदेह एअर होस्टेसचा असू शकतो.

चौकशीत अनेक  यंत्रणा सहभागीबोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या चौकशीत विमान अपघात तपास संस्था (एएआयबी), नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), अहमदाबाद पोलिस या यंत्रणा अपघाताच्या चौकशीत सहभागी झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 

अपघाताचा व्हिडीओ बनवणाऱ्या मुलाचा पोलिसांसमोर जबाबविमान अपघाताचा मोबाईल फोनवरून व्हिडीओ बनवणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा जबाब अहमदाबाद पोलिसांनी नोंदविला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकारांशी बोलताना व्हिडीओ बनविणारा मुलगा आर्यन म्हणाला की, रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर २४ सेकंदात हा अपघात झाला. आर्यन हा नियमितपणे विमानांच्या उड्डाणाचे व्हिडीओ बनवितो. त्या दिवशी या व्हिडीओमध्ये या विमान अपघाताचे शूटिंग झाले. पोलिसांनी सांगितले की,  व्हिडीओ बनवल्याबद्दल कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. व्हिडीओ बनवणाऱ्या अल्पवयीन मुलाने व्हिडीओची माहिती पोलिसांना दिली आहे. तो त्याच्या वडिलांसोबत साक्षीदार म्हणून त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी आला होता. त्यानंतर मुलाला त्याच्या वडिलांसोबत पाठवण्यात आले. आर्यन म्हणाला, मी जे पाहिले ते पाहून मी खूप घाबरलो. माझ्या बहिणीने माझा व्हिडीओ सर्वात आधी पाहिला व वडिलांना कळविले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद