शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

विमानात उकळते पाणी अंगावर पडून वृद्धा भाजली

By admin | Updated: August 28, 2014 02:33 IST

घरातील एका लग्न समारंभासाठी दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षांची महिला प्रवासी अंगावर उकळते पाणी सांडून भाजल्याची घटना स्पाईसजेट कंपनीच्या विमानात अलीकडेच घडली

नवी दिल्ली: घरातील एका लग्न समारंभासाठी दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षांची महिला प्रवासी अंगावर उकळते पाणी सांडून भाजल्याची घटना स्पाईसजेट कंपनीच्या विमानात अलीकडेच घडली. संतापजनक गोष्ट अशी की ‘बजेट एअरलाईन’ म्हणून नको त्या बाबतीत काटकसर करून चालविल्या जाणाऱ्या या विमानात साधी प्रथमोपचाराची सोय नाही, अंगावर सांडलेले पाणी पुसण्यासाठी टॉवेल किंवा नॅपकिन नाही व विमान कर्मचाऱ्यांना अशा वेळी काय करावे याचे कोणतेही प्रशिक्षण नाही या बाबी यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आल्या.रितु सिंग या दिल्लीतील तरुणीने १३ आॅगस्ट रोजी स्पाईसजेटच्या दिल्ली-हैदराबाद या मार्गावरील दुपारच्या विमानात आपल्या आईच्या बाबतीत घडलेल्या या घटनेची माहिती दिली. रितु सिंग यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई विमानात मार्गिकेशेजारच्या आसनावर बसली होती. यशस्वी उड्डाणानंतर विमान हवेत बऱ्यापैकी उंचीवर गेल्यावर कुणाल नावाचा एक विमान कर्मचारी (प्लाईट स्टेवर्ट) प्रवाशांना ग्रीन टी देण्यासाठी आला. तोल जाऊन त्याच्या हातातील उकळत्या पाण्याची किटली रितुच्या आईचा हात तसेच पाठ आणि आसनाचा मागे टेकण्याचा भाग यामध्ये उलटी झाली. पाणी पाठीवरून ओघळून कंबरेपर्यंत पोहोचले. हात, पाठ व कंबर चांगलीच पोळून निघाली व मोठे फोड आले. आधीच उच्च रक्तदाब, संधीवात व कोलेस्ट्रोलचा त्रास असलेली रितुची आई असह्य वेदनांनी किंचाळू लागली. काही क्षणांसाठी तिची शुद्धही हरपली. रितु सिंग यांनी पुढे सांगितले की, आणखी वाईट म्हणजे विमान कर्मचारी कुणाल एका पेपरकपमध्ये बर्फ घेऊन आला व पोळलेल्या भागांवर त्याने एवढ्या जोराने बर्फ चोळण्यास सुरुवात केली की त्या वेदनांनी रितुची आई आणखी विव्हळू लागली. रितुच्या कुटुंबियांनी सांडलेले पाणी पुसण्यासाठी टॉवेल किंवा कापडी नॅपकिन देण्याची विनंती केली. पण यापैकी काहीही विमानात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मागूनही तक्रार-पुस्तक दिले गेले नाही व विमानात घडलेल्या घटनेची तक्रार कंपनीच्या वेबसाईटवर फक्त आॅनलाईनच करता येईल, असे सांगितले गेले, अशीही तक्रार त्यांनी केली.अजूनही औषधोपचार सुरु रितु सिंग यांनी असेही सांगितले की, या घटनेला १५ दिवस झाले तरी अजूनही माझ्या आईची अ‍ॅन्टीबायोटिक औषधे सुरु आहेत. आई अथरुणावर खिळून राहिल्याने लग्न समारंभाच्या आनंदावर विरजण पडले. दिल्लीला परतल्यापासून खूप ताप भरल्याने आईने पुन्हा अंथरूण धरले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)