शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या राज्यपालांशिवाय एअर एशिया विमानाचे उड्डाण, चौकशी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 17:05 IST

90 मिनिटे वाट पाहिल्यानंतर राज्यपाल दुसऱ्या विमानाने हैदराबादला रवाना झाले.

कर्नाटकातील बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना न घेता एअर एशियाचे विमान हैदराबादसाठी रवाना झाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 वरून हैदराबादला जाणार होते. या प्रकरणाबाबत राज्यपालांच्या प्रोटोकॉल टीमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यपाल वेळेपूर्वी व्हीव्हीआयपी लाउंजमध्ये थांबले होते. व्हीआयपी लाउंजमधून ते धावपट्टीवर पोहोचले, तोपर्यंत विमान हैदराबादला रवाना झाले. त्यानंतर 90 मिनिटे वाट पाहिल्यानंतर राज्यपाल दुसऱ्या विमानाने हैदराबादला रवाना झाले.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण? प्रोटोकॉल टीमच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यपाल थावरचंद गेहलोत गुरुवारी (27 जुलै) दुपारी 1.30 वाजता विमानतळावर पोहोचले होते आणि टर्मिनल 1 च्या व्हीव्हीआयपी लाउंजमध्ये बसले होते. तसेच, एअरलाइन्सच्या ग्राउंड स्टाफला राज्यपाल आल्याची माहिती देण्यात आली होती. एअर एशियाचे हे विमान दुपारी 2.50 वाजता उड्डाण घेणार होते. राज्यपाल टर्मिनल 1 वरून 2:06 वाजता टर्मिनल 2 वर पोहोचले, परंतु एअरलाइन्सच्या स्टाफने विलंबाचे कारण देत त्यांना विमानात बसण्याची परवानगी दिली नाही. 

90 मिनिटांनंतर दुसऱ्या विमानाने रवाना पीटीआय एजन्सीनुसार, राज्यपाल थावरचंद गेहलोत गुरुवारी दुपारी टर्मिनल-2 वरून हैदराबादला जाणार होते, तेथून ते दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी रस्त्याने रायचूरला जाणार होते. एअर एशियाचे विमान येताच गेहलोत यांचे सामान त्यात चढवण्यात आले होते. दरम्यान, सुत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यपालांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला. ते व्हीआयपी लाउंजमध्ये पोहोचले, तोपर्यंत विमान हैदराबादला रवाना झाले होते. त्यानंतर हैदराबादला पोहोचण्यासाठी राज्यपालांना 90 मिनिटांनी दुसरे विमान घ्यावे लागले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकair asiaएअर एशिया