शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

"समान नागरी कायदा आल्यास हिंदू बांधवांना सर्वाधिक त्रास होईल", ओवेसींनी वाचले सर्व नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:21 IST

uniform civil code : 'समान नागरी कायदा' लागू करण्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे.

asaduddin Owaisi On UCC : सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी 'समान नागरी कायदा' हा मुद्दा आहे. या कायद्याला एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुरूवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. जर हा कायदा लागू झाल्यास याचा सर्वाधिक त्रास हिंदू बांधवांना होईल, असे म्हणत ओवेसींनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.  

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, समान नागरी कायदा लागू झाल्यास हिंदू बांधवांचे अनेक अधिकार काढून घेतले जातील, ज्यात विवाह कायदा तसेच अनेक सामाजिक आणि धार्मिक प्रथांचा समावेश आहे. ओवेसी यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये हिंदूंना दिलेल्या विशेषाधिकारांचा उल्लेख केला आहे. तसेच कायदा लागू झाल्यास हिंदूंचे हे अधिकार काढून घेतले जातील असा दावा त्यांनी केला आहे.

...तर पारंपारिक रीतिरिवाजानुसार लग्न करता येणार नाहीदरम्यान, हिंदू विवाह कायदा, १९५५ चा हवाला देत ओवेसी यांनी म्हटले, "या कायद्यात हिंदू बांधवांसाठी वडिलांच्या सात पिढ्या आणि आईच्या पाच पिढ्यांपर्यंत लग्न होऊ शकत नाही, असे म्हटले आहे, परंतु याला अपवाद देण्यात आला आहे. पण समान नागरी कायदा आल्यास हा अपवाद संपेल." तसेच हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ मध्ये असे नमूद आहे की, तुम्ही तुमचे लग्न तुमच्या पारंपारिक रीतिरिवाजानुसार करू शकता परंतु हा कायदा आल्यास ते करता येणार नाही, असेही ओवेसींनी सांगितले. याशिवाय हिंदू विवाह कायद्याच्या कलम २ च्या उपकलमचा संदर्भ देत ओवेसींनी सांगितले की, हिंदू विवाह कायदा अनुसूचित जमातींना लागू होणार नाही, परंतु समान नागरी कायदा आल्यास या बांधवांचा देखील अधिकार हिरावून घेतला जाईल.

हिंदू बांधवांचे नुकसान - ओवेसी "फक्त हिंदू बांधवांना अशी सुविधा देण्यात आली आहे की, त्यांनी जर संयुक्त कुटुंबात राहून व्यवसाय सुरू केल्यास त्यांना करात सूट मिळेल, मात्र समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेतला जाईल. २०१५ ची आकडेवारी पाहिली तर या कायद्यामुळे हिंदू बांधवांना ३०६५ कोटी रूपयांच्या करात सूट मिळाली होती. तर, पाल्याला दत्तक घेतल्यावर देखील हिंदूंना करात सूट मिळाली", असा दावा ओवेसी यांनी केला आहे. 

RSS वर साधला निशाणासमान नागरी कायदा लागू केल्यास मुस्लिमांचे नुकसान होईल असे वातावरण तयार केले जात आहे. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा विचार करत असेल की, यामुळे केवळ मुल्लाजींच्या लोकांना लक्ष्य केले जाईल, तर तुम्ही आमच्या नावावर इतरांचे नुकसान करत आहात, अशी टीका ओवेसींनी केली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनUniform Civil Codeसमान नागरी कायदाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदूMuslimमुस्लीम