शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Khargone Violence : खरगोनमध्ये अद्यापही कर्फ्यू सुरूच, आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालल्यानं ओवेसी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 10:58 IST

"सत्तेच्या नशेत गरिबांची घरं उद्धवस्त केली जात आहेत. आज त्यांचे सरकार आहे, पण उद्या नसेल, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे."

मध्य प्रदेशातील खरगोन येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार झाला. यावरू आता राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. या घटनेवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्यावर निशाणा साधला आहे.

ओवेसी म्हणाले, मध्य प्रदेशात कायद्याच्या शासन व्यवस्थेपेक्षाही जमाव वरचढ झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची विचारधारा भलेही मशिदींचे विटंबन करणारी आणि ज्येष्ठांवरील हल्ल्यांना योग्य ठरवणारी असेल. पण ते घटनात्मक पदावर आहेत, हे त्यांनी विसरायला नको. जनतेचा जीविताचे आणि मालमत्तेचे संक्षण करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. एवढेच नाही, तर सत्तेच्या नशेत गरिबांची घरं उद्धवस्त केली जात आहेत. आज त्यांचे सरकार आहे, पण उद्या नसेल, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - गेल्या 10 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त खरगोन येथे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी काही लोकांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केली. यामुळे परिसरात हिंसाचार सुरू झाला. एवढेच नाही, तर यावेळी काही लोकांनी पेट्रोल बॉम्बदेखील फेकले. या संपूर्ण घटनेत सर्वसामान्यांसह 20 पोलीसही जखमी झाले होते.

मध्य प्रदेशात 2023 मध्ये निवडणुका - रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर मध्य प्रदेश सरकार अॅक्शनमध्ये आले आणि जिल्हा प्रशासनाने दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या घरावर थेट बुलडोझर चालवले. यानंतर ही कारवाई एकतर्फी असल्याचे म्हणत, ओवेसी यांनी शिवराज सिंह सरकारवर निशाणा साधला आहे. पुढच्या वर्षी, म्हणजेच 2023 मध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि असदुद्दीन ओवेसीही या निवडणुकीत भाग्य आजमावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. खरे तर, मध्यप्रदेशातील निवडणुकीसंदर्भात त्यांच्या पक्षाकडून यापूर्वी अनेक वेळा भाष्य करण्यात आले आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशRam Navamiराम नवमी