शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 08:20 IST

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ झाली आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते. अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले असताना काही मिनिटांतच ते कोसळले. मात्र आता अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. प्रवाशांव्यतिरिक्त स्थानिक लोकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. अपघातस्थळी ढिगारा काढण्याचे काम अजूनही सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत २६५ जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र आता हा आकडा वाढल्याने आणखी धक्का बसला आहे.

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे, तर स्थानिकांमध्ये ३३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार शुक्रवारी विमानाचा ढिगारा बाहेर काढणाऱ्या बचाव पथकांना क्रॅश झालेल्या ७८७-८ ड्रीमलाइनर विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि आणखी २९ मृतदेह सापडले. त्यामुळे मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची संख्या २४१ हून अधिक झाली आहे. तर इतर ३३ जण हे अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमधील डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय विद्यार्थी, कर्मचारी आणि मेघनीनगर परिसरातील लोक असल्याचे म्हटलं जात आहे.

मृतांमध्ये १० डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. विमानाचा ढिगारा काढण्याचे काम रात्रभर सुरू आहे. या कामात १०० हून अधिक कामगार आणि ४० इंजिनिअर गुंतले आहेत. तपास अधिकाऱ्यांना अपघातानंतर २८ तासांनी बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या मेसच्या छतावर ब्लॅक बॉक्स सापडला. त्यामुळे आता अपघाताचे नेमके कारण समजण्यास मदत होणार आहे. अपघाताचा सर्वाधिक फटका बसलेल्या कॅम्पस इमारती आणि जवळपासच्या भागात रात्रीच्या वेळी शोध मोहिमा राबवण्यात येत आहे. मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए मॅचिंगसाठी ३१९ मृतदेहांचे अवयव पाठवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, विमानातील २४१ जणांच्या व्यतिरिक्त मृतांमध्ये तीन डॉक्टर आणि एका गर्भवती महिलेचा समावेश होता. ती गर्भवती महिला न्यूरोसर्जरी करणाऱ्या डॉक्टरची पत्नी होती. चौथा मृतदेह एमबीबीएसचा विद्यार्थी जय प्रकाश चौधरी याचा आहे. तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी कुटुंबियांनी जय प्रकाशचा मृतदेह ओळखला.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया