शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद जिल्हा रुग्णालयात तीन दिवसांत १८ बालकांचा मृत्यू; अर्भक मृत्यूच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:09 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून नऊ अर्भकांच्या झालेल्या मृत्युच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

अहमदाबाद : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून नऊ अर्भकांच्या झालेल्या मृत्युच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या घटनानंतर काँग्रेसने रविवारी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.पाच अर्भकांना दूर अंतरावरून रुग्णालयात आणण्यात आले होते. जन्मत:च त्यांचे वजन अत्यंत कमी असल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती तर इतर अर्भकांच्या जीविताला घातक अशा रोगांची बाधा झाली होती व त्यांची परिस्थिती चिंताजनक होती, असे सरकारने रविवारी निवेदनात म्हटले.२४ तासांत मरण पावलेल्या नऊ अर्भकांपैकी पाच लुणावाडा, सुरेंद्रनगर, मनसा, विरमगाम, हिंमतनगर या दूर अंतरावरून आणण्यात आले होती व त्यांची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक होती. ज्या चार अर्भकांचा रुग्णालयात जन्म झाला ते जन्मत:च श्वासावरोधामुळे मरण पावले. रुग्णालयात गेल्या तीनदिवसांत १८ अर्भकांचा मृत्यू झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण उप संचालक आर. के. दीक्षित या मृत्युंना कोणती कारणे जबाबदार आहेत याची चौकशी करतील. (वृत्तसंस्था)मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी गांधीनगरमध्ये रविवारी वरिष्ठ अधिकाºयांच्या घेतलेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला, असे आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव जयंती रवी यांनी सांगितले. जयंती रवी म्हणाल्या की, काही अर्भकांची प्रकृती खालावलेली होती. दूर अंतरावरून त्यांना येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते कारण तेथील डॉक्टर्स दिवाळीच्या सुटीवर होते. मृत्युच्या प्रथमदर्शनी कारणांची चौकशी समिती करील व अहवाल एका दिवसात देईल अशी अपेक्षा आहे.अत्यंत कमी वजनाची बाळे जन्मण्याचे प्रमाण कमी कसे करायचे याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. गरोदर महिलांना गरोदरपणात पुरेसा पौष्टीक आहार मिळत नाही. येथील सामान्य रुग्णालयात रोज नवजात अर्भकांच्या मृत्युचे प्रमाण सरासरी पाच ते सहा आहे, असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.