शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:11 IST

Ahmedabad Plane Crash: या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.  

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान (AI-171) अवघ्या 5 मिनिटांत कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते, यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. धावपट्टीवरून उड्डाण करताच हे विमान विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. यामुळे इमारतीलाही मोठी आग लागली. दरम्यान, संबंधित इमारतीतील अनेक जण जखमी झाल्याचेही बोलले जात आहे. 

डॉक्टरांच्या वस्तिगृहावर कोसळलं विमान -या दुर्घटनेनंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली. अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचा मागचा भाग मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर अडकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

विमान इमारतीवर कोसळ्यानंतर, मोठा ब्लास्ट झाला आणि आग लागली. यानंतर सर्वत्र धूरच धूर दिसू लागला. अपघातानंतर डीजीसीएची टीम घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी करेल. दरम्यान विमान अपघातानंतर विमानातील लोकांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी? - या घटनेनंतर एअर इंडियाचे निवेदनही समोर आले आहे. यात क्रॅश झालेल्या विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.  

बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान -अहमदाबादहून दुपारी 1:38 वाजता निघालेले हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (VT-ANB) विमान होते. जे अहमदाबाद एयरपोर्टच्या रनवे 23 वरून टेकऑफ करत होते. टेकऑफनंतर लगेचच विमानाने ATC ला ‘मेडे’ कॉल केला. मात्र यानंतर विमानाचा संपर्क तुटला. यानंतर ही दुर्घटना घडली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातdoctorडॉक्टरpassengerप्रवासी