शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी माल साठवणूक कायद्याच्या कक्षेत यावी, कायद्यात सुधारणा हवी; किसान संघाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:55 IST

सर्वांना थोडाबहूत लाभ मिळत असला तरी काही जणांना जादा लाभ मिळू नये, यासाठी मोठ्या उद्योग समूहांची साठवणूक कायद्याच्या कक्षेत आणावी, अशी आग्रही मागणी  किसान संघाचे राष्ट्रीय महामंत्री ब्रदीनारायण चौधरी यांनी केली.

-  टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सूटता कामा नये. मोठे व्यापारी, उद्योग उभारणाऱ्यांना त्यांच्या इन्स्टाॅल्ड कपॅसिटी पर्यंत सरकारने साठवणूक करण्यास मूभा दिली आहे. परंतु त्यांना साठवणुकीस जीवनावश्यक वस्तू कायदा लागू होणार नाही. मोठे उद्योग त्याबाहेर आहेत. सर्वांना थोडाबहूत लाभ मिळत असला तरी काही जणांना जादा लाभ मिळू नये, यासाठी मोठ्या उद्योग समूहांची साठवणूक कायद्याच्या कक्षेत आणावी, अशी आग्रही मागणी  किसान संघाचे राष्ट्रीय महामंत्री ब्रदीनारायण चौधरी यांनी केली.भारतीय किसान संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संघटना आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चौधरी यांनी लोकमतशी संवाद साधला. कृषी कायद्यात सुधारणा करण्याची चर्चा आधीपासूनच सुरू आहे. त्यात सारे शेतकरीच होते. आता मात्र शेतकरी आंदोलनाचा उद्देश बदलला असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्याकडून माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना केवळ पॅन कार्ड गरजेचे आहे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करून व्यापाऱ्यांना खरेदीसाठी नोंदणीची सक्ती करावी. शिवाय बँक सिक्युरिटीदेखील प्रत्येक व्यापाराला देणे बंधनकारक असावे, असेही ते म्हणाले.वीस हजार गावांतून सरकारला लाखो ईमेलआंदोलनात सहभागी न होण्यावर चौधरी म्हणाले, भारतीय किसान संघाने कधीही कायदा रद्द करण्याची, तो मागे घेण्याची मागणी केली नाही. आम्ही प्रारंभापासूनच कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करीत आहोत. २० हजार गावांमधून लाखो पत्र, ई मेल सरकारला पाठवण्यात आले आहेत. काही मुद्दे मसुद्यात होते. आमचा भर चर्चेवर आहे. हमीभावासंदर्भात ते म्हणाले, त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. कायदेशीर मार्गानेच एमएसपीची अंमलबजावणी व्हावी. केवळ सरकारची खरेदी पुरेशी नाही.सरकार संपूर्ण माल खरेदी करू शकत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याबाहेर देखील हमीभावापेक्षा जास्त दराने खरेदी व्हायला हवी.