शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 15:27 IST

88 वर्षांच्या विद्या देवी आग्रा येथील कमला नगरच्या रहिवासी आहेत. त्यांना चार मुलं असून ते चौघेही करोडपती आहेत. प्रत्येकाकडे आलिशान बंगले, नोकर आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र कोणाच्याच घरात आईसाठी जागा नाही.

आज सर्वत्र मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 88 वर्षांच्या विद्या देवी आग्रा येथील कमला नगरच्या रहिवासी आहेत. त्यांना चार मुलं असून ते चौघेही करोडपती आहेत. प्रत्येकाकडे आलिशान बंगले, नोकर आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र कोणाच्याच घरात आईसाठी जागा नाही. विद्या देवी गेल्या 2 वर्षांपासून आग्रा येथील रामलाल वृद्धाश्रमात राहत आहेत. 

विद्या देवी या आग्रा येथील प्रसिद्ध नेत्र रुग्णालयाचे संस्थापक गोपीचंद अग्रवाल यांच्या पत्नी आहेत. गोपीचंद यांची गणना शहरातील अब्जाधीशांमध्ये होते. चारही मुलांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभं करून सर्वांचं लग्न लावून दिलं. 14 वर्षांपूर्वी गोपीचंद यांचं निधन झालं त्यानंतर विद्या देवी यांचं आयुष्य बदलू लागलं. मुलांनी मालमत्ता वाटून घेतली आणि वृद्ध आईला एकटं सोडलं. 

विद्या देवी म्हणतात की, देवाने असं कोणासोबतही होऊ देऊ नये. पूर्ण कुटुंब असूनही वृद्धाश्रमात राहावं लागतं. गेल्या दोन वर्षांपासून कोणीही त्या जिवंत आहेत की नाही हे देखील पाहिलं नाही. 10 वर्षांपासून दोन मुलांशी बोलले नाहीत. कधी कधी नातू येतो आणि फक्त 5000 रुपये देऊन निघून जातो. 

विद्या देवी यांनी देवाने अशी मुलं कोणाला देऊ नयेत असं म्हटलं आहे. लग्नानंतर मुलं बदलली. सूनही योग्य काळजी घेत नाही. शिव्या देते. एक मुलगी आहे, तिनेही पाठ फिरवली आहे. नातवंडांचे चेहरे पाहण्याची इच्छा असते. आता शरीरही सहकार्य करत नाही. अलीकडे पडल्यामुळे माझ्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असं म्हटलं आहे. विद्या देवी आता परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. त्यांनी वृद्धाश्रम हे आपलं घर म्हणून स्वीकारलं आहे. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.