शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध; रस्त्यावर उतरून अनेक ठिकाणी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 11:05 IST

सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध

एस. पी. सिन्हापाटणा :

सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत.

बिहारमध्ये आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे ट्रॅक जाम केला, तर मुझफ्फरपूरमधील मादीपूरमध्ये आग लावून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आरा येथेही मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आंदोलक भरती योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.- केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या योजनेनुसार सैन्याच्या तिन्ही दलात तरुणांची भरती केली जाणार आहे. या तरुणांना चार वर्षे सैन्यात सेवा द्यावी लागणार आहे.

दगडफेक अन् चक्काजामबिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली. मुजफ्फरपूरमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले. या तरुणांनी बेगुसरायमध्येही निदर्शने केली.

तरुण काय म्हणतात...?- मुजफ्फरपूरमध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांनी बुधवारी सकाळी सैन्य भरती बोर्डाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. सरकारची योजना ही योग्य नाही. - चार वर्षांसाठी भरती करणे म्हणजे रोजगाराच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. चार वर्षांत आमचे काय होणार आहे. पेन्शनची सुविधाही नाही, असे या तरुणांनी स्पष्ट केले. माजी लष्करप्रमुख काय म्हणतात...?अग्निपथ योजनेमुळे लष्कराची रचना बिघडणार का? माध्यमांच्या या प्रश्नावर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह म्हणाले की, कोणतीही नवीन गोष्ट जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही, तोपर्यंत त्याबद्दल अधिक माहिती नसते. ज्या टीमने ही योजना बनवली, त्या टीमचा मी भाग नाही. मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. योजना नुकतीच जाहीर झाली आहे. पुढे काय होते ते पाहू.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान