शपथविधीला उपस्थित राहणार
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्राच मुख्यमंत्रिपदाच्या घडामोडी मंगळवारी मुंबईत घडत होत्या, तेव्हा गडकरी राजधानीत राष्ट्रीय सडक सुरक्षा परिषदेच्या बैठकीत व्यस्त होते. अलीकडच्या सा:या राजकीय घडामोडी पाहता, गडकरींची आजची व्यस्तता कमालीची धीरगंभीर होती. देशभरातून आलेल्या परिवहन मंत्र्यांची भाषणो, अधिका:यांचे सादरीकरण ते ऐकत होते, पाहत होते. दुपारी तेथून ते थेट नागपूरला निघाले. परिषदेत नेहमीच्या नर्मविनोदी शैलीत त्यांचे तासाभराचे भाषण झाल़े महाराष्ट्राचे अनेक संदर्भ त्यांनी या वेळी दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रस्ते कसे तयार केले, हायवे कसे विस्तारले याबाबत सांगितले. हे सांगताना क्षणभर थांबलेही. त्यांच्या चेह:यावरील अस्वस्थता लपत नव्हती. चार तासांनंतर भोजनाआधी पत्रकांरानी त्यांना गाठले, त्या वेळी राजकारण सोडून अन्य विषयांना त्यांनी उत्तरे दिली. ते नेहमीचे गडकरी वाटत नव्हते. एरव्ही गडकरींची देहबोली कोणाही वाचू शकतो, निरीक्षणो नोंदवू शकतो. अघळपघळ व बिनधास्त ही त्यांची शैली. हातचे राखून न ठेवता स्पष्ट बोलून मोकळे व्हायचे, असे त्याचे मन. थोडे मिश्कील भाव ठेवून त्यांचा चेहरा नेहमीच हसरा व प्रसन्न असतो. पण आज या सा:या नेहमीच्या गोष्टी गडकरी कुठेतरी विसरले होते. महाराष्ट्रात एवढी मोठी उलथापालथ होत आहे, तिथे गडकरींशिवाय राज्याची घडी बसविली जात आहे, असे शेवटी त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘शपथविधीसाठी जाणार आहे.!’ एकनाथ खडसे यांची राजी-नाराजी, शिवसेनेच्या गोटातील रुखरुख शिगेला पोहोचली होती. राजनाथसिंह, ओम माथुर, राजीव प्रताप रुडी जेव्हा मुंबईत चर्चा करीत होते, तेव्हा गडकरींचे विमान आकाशात ङोपावत होते.