शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

प्लास्टिकनंतर आता जिप्समनं तयार होणार रस्ते, NHAI नं तयार केला 'मास्टरप्लान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:51 IST

प्लास्टिक आणि फ्लाय अॅश नंतर आता, NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फॉस्फर-जिप्सम खत रासायनिक कंपन्यांच्या सहकार्याने रस्ते बांधणीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लास्टिक आणि फ्लाय अॅश नंतर आता, NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फॉस्फर-जिप्सम खत रासायनिक कंपन्यांच्या सहकार्याने रस्ते बांधणीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. NHAI ने या प्रकल्पाची फील्ड चाचणी जाहीर केली आहे. फॉस्फर-जिप्सम हे खतांचे उप-उत्पादन आहे. NHAI च्या मते, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कचरा सामग्री म्हणून वापरल्यास कार्बनचे विसर्जन टाळता येईल.

रस्ते फॉस्फर-जिप्समचे बनवले जातीलएका भारतीय खत कंपनीने रस्ते बांधणीत फॉस्फर-जिप्समचा वापर केला आहे. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने (CRRI) रस्त्याचे मूल्यांकन केले होते. त्यांच्या अहवालानुसार, इंडियन रोड काँग्रेस (IRC) ने तीन वर्षांच्या कालावधीसाठी रस्त्याच्या बांधकामासाठी फॉस्फर-जिप्सम कचरा सामग्रीला मान्यता दिली आहे.

NHAI तयार केला प्लानफॉस्फर-जिप्सम वेस्ट मटेरियल वापरून तयार केलेला रस्ता तपासल्यानंतर त्याची फील्ड ट्रायल मंजूर करण्यात आली, जेणेकरून लोकांचा या रस्त्यांवर विश्वास बसेल आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. NHAI देखील रस्ते बांधणीत प्लास्टिक कचऱ्याच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. ज्याची चाचणी यापूर्वीही अनेकदा झाली आहे. अहवालानुसार, प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून बनवलेले रस्ते टिकाऊ असतात आणि बिटुमनचे आयुष्य वाढवतात. इतकेच नव्हे तर एक किलोमीटरचा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग तयार केल्याने सुमारे सात टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत होते.

फ्लाय अॅशचाही वापर NHAI ने महामार्ग आणि उड्डाणपूल बनवण्यासाठी 'फ्लाय अॅश' म्हणजेच थर्मल पॉवर प्लांट्समध्ये (TPP) कोळशाची राख वापरली आहे. १३५ किमी लांबीच्या, सहा लेनच्या 'ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे'च्या बांधकामात १२ दशलक्ष घनमीटर फ्लाय अॅश वापरण्यात आली आहे.

NHAI नवीन सामग्रीच्या वापरास प्रोत्साहन देते आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करते. टिकाऊपणा वाढवणे आणि बांधकाम अधिक परवडणारे बनवणे यावर NHAI अधिक भर देत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक