शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मतदानानंतर शाई नव्हे, लेझर मार्क! निवडणूक आयाेगाची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 05:41 IST

‘एआय’चा वापर, फोटोही काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे.  

यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. या यंत्रणेचा वापर झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकतो.

शाई असते महागमतदानासाठी बाेटांवर लावण्यात येणाऱ्या शाईत चांदी असलेले एक सिल्व्हर नायट्रेट हे  रसायन वापरले जाते. चांदीचा वापर केल्यामुळे ही शाई महाग असते

असा बसेल बोगस मतदानाला आळालेझर स्पॉट केल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली तर ती पकडली जाईल. दुसरीकडे, ईव्हीएममध्ये बसविण्यात आलेला कॅमेरा एआय तंत्रज्ञानाने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओळखून निवडणूक अधिकाऱ्याला अलर्ट पाठवेल.

सर्वप्रथम वापर कधी ?मतदानामध्ये विशिष्ट शाईचा वापर भारतात सर्वप्रथम १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत करण्यात आला हाेता. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत याचा वापर करण्यात आलेला आहे. म्हैसूर पेंट्स ॲण्ड वार्निश लिमिटेड ही एकमेव कंपनी ही शाई तयार करते. यासाठी राष्ट्रीय फिजिकल लेबाॅरेटरी ऑफ इंडिया आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कार्पाेरेशनने कंपनीसाेबत करार केला आहे.  महाराज कृष्णराजा वडियार चतुर्थ यांनी १९३७ मध्ये कंपनीची स्थापना केली हाेती.

२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत शाईच्या २६ लाख बाटल्यांची ऑर्डर निवडणूक आयाेगाने दिली हाेती. त्यासाठी ३३ काेटी रुपये देण्यात आले हाेते. साधारणत : ३५० मतदारांसाठी एक बाटली पुरते. वर्ष     शाईच्या बाटल्या२००९    २० लाख२०१४    २१.५ लाख२०१९    २६ लाख

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग