शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

उत्तर प्रदेशात अखेर भाजपचे हिंदू कार्ड चालले

By admin | Updated: March 13, 2017 01:02 IST

उत्तर प्रदेशात आम्हाला सरकार स्थापन करण्यायोग्य जागा मिळतील, पण कमतरता भासल्यास अपक्षांच्या मदतीने काम चालविले जाईल, असे भाजपच्या एका प्रवक्त्याने मला एक्झिट पोलच्या दिवशी

निवडणूक विश्लेषण, अभय कुमार दुबे नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आम्हाला सरकार स्थापन करण्यायोग्य जागा मिळतील, पण कमतरता भासल्यास अपक्षांच्या मदतीने काम चालविले जाईल, असे भाजपच्या एका प्रवक्त्याने मला एक्झिट पोलच्या दिवशी ‘आॅफ द रेकॉर्ड’ सांगितले होते. याचा अर्थ या राज्यात भाजपची लाट असल्याबाबत पक्षनेतृत्वाला खात्री नव्हती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होणार, ही भविष्यवाणी भाजपचे नेते करू शकत नव्हते. त्यामुळेच भाजपचे समर्थकही या निकालाने अचंबित झाले आहेत. विरोधक भुईसपाट झाले आहेत. उत्तर प्रदेशात कुणाचीही लाट नसल्यामुळे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची भाषा करणाऱ्यांची हवाही निघून गेली आहे.भाजपने हे अभूतपूर्व यश कसे मिळविले, हा प्रश्न पडतो. त्याची अनेक कारणे आहेत. या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई व्यक्तीला देणे सहज ठरते. मात्र मोदी तर बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीतही होते. पण तेथे भाजपला विजय मिळवता आला नाही. मोदींच्या व्यक्तिमत्त्वासोबत सामाजिक समीकरण जोडण्यात आलेले अपयश हे त्यामागचे कारण होते. आजवर हिंदूंची मते ही संकल्पना रा.स्व. संघांच्या विचारधारेत कैद झाली होती. उत्तर प्रदेशात भाजपने हिंदूंची मते जोडत ती मुक्त केली. आतापर्यंत हिंदूंच्या ऐक्याच्या नावावर भाजपने उच्चवर्णीय आणि बिगर यादव मागासवर्गीयांची मतेच जोडण्याचे काम केले होते. त्यामुळे या पक्षाला १७० ते २२१ जागांवर समाधान मानावे लागत होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपच्या रणनीतीकारांनी हिंदू मतांच्या ऐक्याला यथार्थ रूप मिळवून दिले.बिगर यादव आणि बिगर जाटव जातींच्या सकारात्मक समर्थनामुळे भाजपला मतांची टक्केवारी ४० पर्यंत नेण्यात यश मिळाले. भाजपने सांप्रदायिक ध्रुवीकरणाचा डाव खेळल्याचा आरोप चुकीचा आहे. भाजपने बहुसंख्यक मतदारांना हिंदुत्वाचे स्मरण करवून दिले. त्यामागे समाजवादी पक्ष आणि बसपाची मुस्लीमकेंद्रित रणनीतीही होती. अखिलेश यांचे सरकार स्थापन झाल्यास ते केवळ यादव आणि मुुुस्लिमांचे सरकार असेल. मायावतींचे सरकार आल्यास केवळ जाटव आणि मुस्लिमांचे सरकार असेल, हे ठसवून देण्यात भाजपला यश मिळाले.शहा यांची रणनीती यशस्वी...अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपने हिंदू मतांच्या ऐक्याची कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. विराट हिंदू व्होट बँक एकवटण्यात उच्चवर्णीयांच्या कटिबद्धतेचा समावेश तर आहेच; सोबत गैर-यादव आणि गैर-जाटव जातींच्या सकारात्मक समर्थनाचाही वाटा आहे. संघटनात्मक बदलापासून प्रारंभ...भाजपने निवडणुकीपूर्वी ब्राह्मण नेते लक्ष्मीकांत वाजपेयी यांना हटवत मागासवर्गीय केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे प्रदेशनेतृत्व सोपविले. अपना दल, सुहैल देव यांच्या पक्षाशी युती केली. अनेक कमकुवत जातींच्या नेत्यांना संघटनात्मक स्थान दिले. उच्चवर्णीयांची मते मिळणारच ही गृहित धरत भाजपने कमकुवत जातींची मते मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले. अखिलेश सरकारने पाच वर्षे अतिरेकी आणि निर्लज्ज यादववाद चालविला होता, तर विरोधी पक्षनेत्या म्हणून मायावती पूर्ण निष्प्रभ ठरल्या होत्या. भाजपच्या यशात त्याचेही योगदान आहे.