शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता सूर्याकडे ‘हनुमान उडी’, ‘चंद्रयान-३’च्या यशानंतर भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 07:03 IST

सूर्यावरील वातावरणाची दूर अंतरावरून निरीक्षणे नोंदविण्यासाठी आदित्य-एल १ हे अवकाशयान बनविण्यात आले आहे.

बंगळुरू : चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारताची इस्रो ही अवकाश संशोधन संस्था सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य-एल १ अंतराळयानाचे येत्या २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी प्रक्षेपण करणार आहे. सूर्यावरील वातावरणाची दूर अंतरावरून निरीक्षणे नोंदविण्यासाठी आदित्य-एल १ हे अवकाशयान बनविण्यात आले आहे. ते सौरवायूच्या स्थितीचीही नोंद करणार आहे. पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावरील लॅगरेंज पाॅइंट ‘एल-१’ येथून ‘आदित्य एल १’ यान अभ्यास करणार आहे. भारताने हाती घेतलेली ही पहिलीवहिली मोहीम असून त्यासाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

आदित्य-एल १ यान अवकाशात केले जाईल प्रक्षेपित - इस्रोने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पीएसएलव्ही-सी ५७ या रॉकेटच्या साहाय्याने आदित्य-एल १ यान अवकाशात प्रक्षेपित केले जाईल. - सूर्याचा सर्वांत बाह्य थर कोरोना तसेच फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअरस यांचा अभ्यास आदित्य-एल १ मधील सात उपकरणांद्वारे केला जाणार आहे. 

नासानेही केला होता सूर्याचा अभ्याससूर्याचे बाह्य आवरण असलेल्या कोरोनामध्ये नासाच्या पार्कर या अवकाश यानाने १४ डिसेंबर २०२१ रोजी प्रवेश करून तेथील पार्टिकल व चुंबकीय क्षेत्राच्या घटकांचे नमुने गोळा केले होते. अंतराळ संशोधन क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणतेही अवकाशयान सूर्याच्या इतके जवळ गेले होते. 

टॅग्स :isroइस्रो