शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

Asaduddin Owaisi Security: ओवेसी आता वापरणार बुलेट प्रूफ कार आणि मागणार हत्यार बाळगण्याची परवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 20:14 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली-

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ओवेसी यांनी त्यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा लोकसभेत दखील उचलला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ओवेसी यांनी केंद्र सरकारनं या हल्ल्यानंतर देऊ केलेली झेड दर्जाची सुरक्षा नाकारली आहे. ते स्वत: आता त्यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन दिल्लीत बुलेट प्रूफ कार वापरण्याची परवागनी मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आत्मरक्षणासाठी एक खास पद्धतीचं हत्यार बाळगण्याचीही परवागनी सरकारकडे मागणार असल्याचं ओवेसी यांनी एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

भ्याड हल्ल्यांना आपण घाबरत नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकार देऊ करत असलेली झेड दर्जाची सुरक्षा नाकारली आहे आणि यातच ते उद्या पुन्हा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मी घाबरुन घरी बसणाऱ्यांमधला नाही, असं ओवेसी म्हणाले. 

"देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. एखाद्या खासदाराच्या जीवाची किंमत गरीब माणसापेक्षा अधिक असू शकत नाही. केंद्र सरकार नेमकं कोणत्या गोष्टीसाठी मला सुरक्षा देऊ इच्छित आहे?", असा प्रतिसवाल यावेळी ओवेसी यांनी केला. ज्या लोकांनी माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यांचा गोळीवर विश्वास आहे. मतदानावर नाही. असे लोक ना संविधानावर विश्वास ठेवत ना न्यायपालिकेवर. कारण असे लोक पूर्णपणे कट्टरतावादी असतात, अशा लोकांना भाजपा काय रोखणार?, असंही ओवेसी म्हणाले. 

ग्लॉक हत्यार बाळगण्याची परवानगीजेव्हा माझ्या भोवती लोक हत्यारं घेऊन चालतात तेव्हा खूप घुसमट होते. माझ्या जीवाचं संरक्षण माझं मरणच करेल आणि जोवर अल्लाहची मर्जी होत नाही. तोवर माझा मृत्यू होणं शक्य नाही, असं ओवेसी म्हणाले. तसंच आपण गृह मंत्रालयाला पत्र लिहून बुलेट प्रूफ कार वापरण्याची परवानगी मागणार असल्याचं ओवेसी म्हणाले. ही कार स्वखर्चानं दिल्लीत ठेवणार असल्याचंही ते म्हणाले. यासोबतच ग्लॉक हत्यार सोबत बाळगण्याची परवानगी सरकारकडे मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीElectionनिवडणूक