शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पाकिस्तानी नागरिकांनो 48 तासांच्या आत जिल्ह्यातून चालते व्हा, बीकानेर डीएमकडून आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 09:37 IST

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

बीकानेर- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका मेजरसह पाच जवानांना वीरमरण आलं. शहिदांमध्ये राजस्थानमधल्या एस. राम यांच्या नावाचाही समावेश आहे. तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्यानंतर राजस्थानातील बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी एक लिस्ट जारी केली आहे. तसेच त्यांनी सीआरपीसी 144 कलम लागू केल्याची माहितीही दिली आहे.पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांच्या आत जिल्हा सोडावा, असंही बीकानेरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच बीकानेर हद्दीतील हॉटेलवाल्यांना पाकिस्तानी नागरिकांना आश्रय देण्यावरही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांसाठी हे आदेश लागू केले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पिंगलान भागात झालेल्या चकमकीत एस. राम शहीद झाले, त्यांचं पार्थिव काल राजस्थानमध्ये आणलं गेलं. 18 तास सुरू असलेल्या या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स आणि पॅरा फोर्सेसच्या टीमनं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन टॉप कमांडरचा समावेश होता. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद14 फेब्रुवारीला पुलवाम्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात जनक्षोभ उसळला. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं घेतली असून, त्याचा म्होरक्या मसूद अजहर आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला