शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

मुंबई स्फोटानंतर टायगर मेमनला भेटलो होतो

By admin | Updated: July 31, 2015 23:55 IST

वाद उफाळला: जम्मू-काश्मीरचे काँग्रेस आमदार उस्मान मजीदचा दावा

वाद उफाळला: जम्मू-काश्मीरचे काँग्रेस आमदार उस्मान मजीदचा दावा
श्रीनगर: मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर आपण पाकव्याप्त काश्मिरात टायगर मेमनला भेटलो होतो, असा दावा पूर्वाश्रमीचा दहशतवादी आणि आता काँग्रेसचे आमदार असलेले उस्मान मजीद यांनी शुक्रवारी केल्याने एक नवा वाद उफाळून आला आहे.
त्यावेळी टायगर त्याचा भाऊ याकूबच्या आत्मसमर्पणाने चिंतित होता. आयएसआय याकूबची हत्या करेल अशी भीती त्याला होती,असाही गौप्यस्फोट आ. मजीद यांनी केला आहे.
याकूबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकविण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मजीद यांनी हा दावा केला आहे. टायगर हा मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे.
उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा येथील आमदार असलेले मजीद यांनी सांगितले की, १९९३ साली दोन ते तीन वेळा टायगरला भेटले होते. तो मुजफ्फराबाद(पीओकेची राजधानी) येथील आमच्या कार्यालयात आला होता. माझी त्याच्याशी मैत्री नव्हती. स्टुडंटस् लिबरेशन फ्रंटचा संस्थापक आणि इखवान- उल- मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिलाल बेग याने माझा टायगरशी परिचय करुन दिला होता.
टायगरची भेट होण्यापूर्वीच त्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडविले होते,असाही दावा त्यांनी केला.
तेव्हा तो आमच्या देशात मोस्ट वॉन्टेड होता. बॉम्बस्फोट का घडविले, अशी विचारणा मी त्याला केली होती. यावर बाबरी मशीद पाडणे आणि त्यानंतरच्या दंगली हे मुख्य कारण असल्याचे त्याने आपल्याला सांगितले होते. त्याकाळात महिलांसह अनेक लोक आपल्याकडे आले होते आणि त्यांनी हत्या होत असल्याचे सांगितल्यानंतर आपण भावूक झालो आणि बॉम्बस्फोट केले,अशी कबुली टायगरने दिली होती,असाही दावा काँग्रेस आमदाराने केला आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाचा कट आणि त्याच्या अंमलबजावणीत पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने आपल्याला मदत केल्याचेही टायगरने मजीद यांना सांगितले होते.
टायगरच्या सांगण्यानुसार,सर्व काही पाकिस्तानने केले होते. कटाची आखणी आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठाही पाकनेच केला होता. आयएसआयच्या निर्देशानुसार टायगर टोळीने हा कट अमलात आणला होता.
याकूब परतल्यानंतर टायगरही आत्मसमर्पण करेल अशी भीती पाकिस्तानला होती. त्यामुळे आयएसआय त्याच्याकडे संशयाने बघत होती. पाकिस्तानात आता आपल्याला पूर्वीपेक्षा कमी आदर मिळत असल्याचीही खंत टायगरने व्यक्त केली होती,असे मजीद यांचे म्हणणे आहे.
आमदाराच्या सांगण्यानुसार याकूबच्या आत्मसमर्पणानंतर टायगरने पाकिस्तान सोडले होते. कारण आयएसआयकडून आपली हत्या होईल, अशी भीती त्याला वाटत होती. तो दुबईला गेला होता. पण बोलणी झाल्यावर आयएसआयने त्याला परत बोलावले. (वृत्तसंस्था)