शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा धडाका सुरूच! आणखी एका धक्क्यासाठी तयार रहा; LPG सिलेंडरनंतर, CNG-PNG च्या किंमतीही वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:22 IST

...तर मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही अशीच पावले उचलावी लागतील.

नवी दिल्ली -दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये ऑक्टोबर महिन्यात सीएनजी आणि पीएनजी (पाईप लाईन केलेला स्वयंपाकाचा गॅस)च्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एका अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  या अहवालानुसार, सरकारने निश्चित केलेल्या गॅसच्या किमतीत सुमारे 76 टक्के वाढ होणार आहे, याचा परिणाम थेट सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींवरही होईल. (After LPG cylinders now the CNG PNG prices can increase up to 10 percent from october)

सरकार अधिकचा गॅस असलेल्या देशांच्या दराचा वापर करते. सरकारी ऑईल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशनसारख्या (ओएनजीसी) कंपन्यांना नामांकनाच्या आधारे देण्यात आलेल्या क्षेत्रासाठी सरकार दर सहा महिन्याला नैसर्गिक गॅसच्या किंमतींचा आढावा घेते. पुढील समीक्षा 1 ऑक्टोबरला होणार आहे.

ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे, की 1 ऑक्टोबर, 2021 ते 31 मार्च, 2022 पर्यंत एपीएम वाढून 3.15 डॉलर प्रती युनिट (एमएमटीटीयू) झाला आहे. आता हा दर 1.79 डॉलर प्रती येनिट एवढा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी पीएलसीच्या केजी-डी6 क्षेत्रात गॅसचा दर 7.4 डॉलर प्रती एमएमबीटीयू एवढा होईल.

आता खासगी कंपनीकडून तुम्ही विकत घेऊ शकता LPG सिलेंडर; केंद्र सरकारची नवी रणनीती

"एपीएम गॅसच्या किमतीत वाढ करणे, हे शहर गॅस वितरण (सीजीडी) कंपन्यांसाठी आव्हान असेल," असे अहवालात म्हणण्यात आले आहे. याचा अर्थ त्यांच्यासाठी सीएनजी आणि पाईपद्वारे येणाऱ्या नैसर्गिक गॅसची किंमत वाढेल. एपीएम गॅसच्या किमती वाढल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीचे वितरण करणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लि. (IGL)ला पुढील एक वर्षात किंमतीत मोठी वाढ करावी लागेल. मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही अशीच पावले उचलावी लागतील.

टॅग्स :Inflationमहागाईdelhiदिल्लीMumbaiमुंबई