शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

31 वर्षाच्या मुलाला गमावलं; 64 व्या वर्षी पुन्हा दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 09:41 IST

दिल्लीतील एका महिलेने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.

ठळक मुद्देआईने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.आईने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.वयाच्या साठीत आमच्या मुलाचं संगोपन करायला आम्ही सुदृढ असणं गरजेच आहे, म्हणूनच प्रत्येक सहा महिन्यातून आम्ही नियमीत वैद्यकिय तपासणी करत असल्याचं जगदिश मीना यांनी सांगितलं

नवी दिल्ली, दि. 2-  दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने वयाच्या 64 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. पोटच्या मुलाचं त्याच्या वयाच्या 31 वा व्या वर्षी निधन झाल्यानंतर एकटी पडलेल्या आईने वयाच्या 64 व्या वर्षी एका गोडंस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. चमेली मीना असं या महिलेचं नाव आहे. दिल्लीत राहणाऱ्या मीना या जोडप्याने 'इन विट्रो फर्टीलायजेशन'च्या सहाय्याने बाळाला जन्म दिला. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. अरमान असं त्या मुलाचं नाव ठेवलं आहे. चमेली मीना यांचे पती 65 वर्षीय जगदिश मीना 2012 मध्ये एका बड्या सरकारी कंपनीतून सेवानिवृत्त झाले.

वयाच्या साठीत आमच्या मुलाचं संगोपन करायला आम्ही सुदृढ असणं गरजेच आहे, म्हणूनच प्रत्येक सहा महिन्यातून आम्ही नियमीत वैद्यकिय तपासणी करत असल्याचं जगदिश मीना यांनी सांगितलं. 'इन विट्रो फर्टीलायजेशन'च्या मदतीने मुलाला जन्म देणारं मीना हेच कुटुंब नाहीये तर गेल्या पाच वर्षात पन्नासपेक्षा जास्त वय असलेल्या 20 ते 25 महिलांनी 'इन विट्रो फर्टीलायसेशन'द्वारे बाळाला जन्म दिल्याचं,दिल्ली आयव्हीएफचे अध्यक्ष डॉ.अनूप गुप्ता यांनी सांगितलं आहे. जर ती महिला शारीरीकदृष्ट्या सुदृढ असेल आणि या ट्रिटमेंटमधून सहजासहजी जाऊ शकेल, तर अशांना आम्ही कसं नाही म्हणणार? तसंच आयव्हीएफची प्रोसिजर सुरू करण्याआधी आम्ही त्या जोडप्याची आर्थिक परिस्थितीही तपासून पाहतो,असंही डॉ.अनूप गुप्ता यांनी सांगितलं आहे. 

आयव्हीएफ तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपल्या मुलाला अपघातात किंवा इतर घटनेते गमावलेले पालकच वयाच्या पन्नाशीनंतर आयव्हीएफ प्रोसिडरचा वापर करतात. आम्ही एक असंही जोडपं पाहिलं आहे ज्यांनी नोकरीतून सेवानिवृत्त होइपर्यंत बाळाचा विचार केला नाही.पण सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी एकटं वाटू लागल्याने त्यांनी आयव्हीएफची मदत घेतली.

गेल्या वर्षी एका पंजाबमधील 72 वर्षीय महिलेने हरियाणा नॅशनल फर्टिलिटी सेंटरमध्ये याच ट्रिटमेंटच्या माध्यमातून सुदृढ बाळाला जन्म दिला होता. आयव्हीएफच्या प्रत्येक केंद्रात 60 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी आयव्हीएफद्वारे बाळाला जन्म दिल्याचा रेकॉर्ड आहे. पण बऱ्याचदा एका विशिष्ट वयापेक्षा जास्त वयाच्या जोडप्याला आयव्हीएफसाठी आम्ही नकार देत असल्याचंही मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. याच कारण म्हणजे जर वयाच्या पन्नाशीत एखाद्या जोडप्याने आयव्हीएफद्वारे बाळाला जन्म दिला तर ते मुलं 20 वर्षाचं होइपर्यंत त्याच्या आईवडिलांनी वयाची सत्तरी गाठली असते. या वयात मुलाचं संगोपन करण्याचं त्यांचं वय नसतं. म्हणून नकार द्यावा लागतो.