ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेशसह चार राज्यांत मिळालेल्या भरघोस यशानंतर भाजपानं पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले आहेत. स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वात ताकदवान नेते म्हणून समोर आले असून, भाजपाला पहिल्यांदाच एवढं मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, गोव्यात जनतेनं भाजपाला साथ दिली आहे. आम्ही चार राज्यांत सरकार स्थापन करणार आहोत. चार राज्यांमधील विजय हा जनतेच्या इच्छाशक्तीचा विजय असल्याचंही अमित शाह म्हणाले आहेत. चार राज्यांनी भाजपावर दाखवलेला विश्वास शत-प्रतिशत खरा करून दाखवणार आहे. आमच्या घोषणापत्रात राम मंदिराचा उल्लेख आहे. पक्षातील योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलं जाईल. भारतीय जनता पार्टी 'राष्ट्रवादी' पार्टी आहे, त्यामुळे आम्ही देशहिताला प्राधान्य देऊ, माझ्याकडे बरंच काम असून, उत्तर प्रदेशचा मतदार देखील नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदू-मुस्लिम असा मतभेद मतदारांमधे राहिला नाही, इतरांनीही आता या मानसिकतेतून बाहेर यावं, असं आवाहनही अमित शाह यांनी केलं आहे. अमेठी, रायबरेलीत १० पैकी ६ जागांवर भाजपा जिंकण्याच्या स्थितीत आहे. सगळ्या देशातला गरीब वर्ग मोदींच्या विविध योजनांमुळे जोडला गेलाय, त्याला जात-धर्म-पंथ या नजरेतून पाहणं सोडून द्या, असंही अमित शाह म्हणाले आहेत. मी उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री बनणार नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही अमित शाह यांनी केलं आहे. पक्षातील योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलं जाईल, पंजाबमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो नाही याचा पश्चाताप आहे.(उत्तर प्रदेश निवडणुकीत मंदिर लाटेपेक्षाही मोदी लाट मोठी)(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)पंजाबमध्ये भाजपानं ३० टक्के मतं मिळवलीयत हे विशेष आहे, पंजाबच्या पराभवावर अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जातीवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार या सगळ्याला मतदारांनीच चोख प्रत्युत्तर दिलंय, असं अमित शाह म्हणाले आहेत. दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात उद्या संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यात येणार असून, त्यानंतर संसदीय मंडळाच्या बैठकीत चार राज्यातले मुख्यमंत्री ठरवले जाणार असल्याचंही अमित शाह म्हणाले आहेत.
स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वात ताकदवान नेते - अमित शाह
By admin | Updated: March 11, 2017 16:16 IST