बेंगळुरू : कर्नाटकच्या मंगळुरू येथे शनिवारी हिंदू संमेलनानंतर दोन गटांमध्ये उडालेल्या संघर्षात ३० जण जखमी झाले. यावेळी लाखो रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही गटांच्या लोकांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या विराट हिंदू हृदय संगममध्ये जवळपास २५,००० हिंदू कार्यकर्ते सामील झाले होते. शनिवारी हे कार्यकर्ते गावी परतताना त्यांचा दुसऱ्या समाजाच्या लोकांसोबत संघर्ष झाला. विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया व संघाचे नेते कल्लदका प्रभाकर भट यांनी अत्यंत प्रक्षोभक अशी भाषणे दिली. दरम्यान, हिंदू कार्यकर्ते शांततेत परत जात असताना दुसऱ्या गटाच्या लोकांनीच त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप बजरंग दलाचे नेते शरण पम्पवेल यांनी केला. (वृत्तसंस्था)
हिंदू संमेलनानंतर संघर्ष, ३० जण जखमी
By admin | Updated: January 19, 2015 03:01 IST