शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे

By admin | Updated: March 25, 2016 02:11 IST

संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने

 - हरीश गुप्ता,  नवी दिल्लीसंपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या महिन्यात पुण्यातील घोडे व्यापारी हसन अली यांच्याशी संबंधित करचोरी आणि हवाला व्यवहाराबद्दलच्या प्रकरणांच्या फायली पुन्हा उघडल्या होत्या आणि आता दिल्लीतील मांस निर्यातदार मोईन अख्तर कुरेशी हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.ईडीने पुन्हा एकदा हसन अलींच्या पुणे आणि अन्य शहारांमधील प्रतिष्ठानांवर छापे घातले आहेत. ईडीचे संचालक कर्नल सिंग यांनी ईडीच्या प्रादेशिक प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांच्या फायलींवरील धूळ झटकण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच अनेक काँग्रेस नेत्यांसोबत निकटचे संबंध असलेले मोईन अख्तर कुरेशी यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याचा निर्णय आयकर विभाग आणि ईडीने घेतल्याचे समजते. आयकर विभागाने करचोरीच्या संदर्भात दंड आकारण्याबाबतची नोटीस जारी केली होती; परंतु नंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कुरेशी यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही.