शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चुलत बहिणीच्या चितेवर भावाने मारली उडी; चितेशेजारीच भावावरही करावे लागले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 08:14 IST

सागर : चुलत बहिणीच्या मृत्यूमुळे शाेकाकुल झालेल्या एका तरुणाने तिच्या चितेवरच उडी घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात ...

सागर :

चुलत बहिणीच्या मृत्यूमुळे शाेकाकुल झालेल्या एका तरुणाने तिच्या चितेवरच उडी घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. दाेन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

करण ठाकूर असे या तरुणाचे नाव आहे. सागर जिल्ह्यातील मझगुवा गावात राहणारी त्याची २१ वर्षीय चुलत बहीण ज्याेती ठाकूर हिचा विहिरीत बुडून मृत्यू झाला हाेता. ती गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता हाेती. भाजी आणण्यासाठी शेतात गेलेली मुलगी परत आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शाेध घेतला. दुसऱ्या दिवशी शंका आल्यामुळे कुटुंबीयांनी शेतातील विहिरीत शाेध घेतला. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर शुक्रवारी दुपारी तिचा मृतदेह आढळला. यासंदर्भात तातडीने पाेलिसांना माहिती देण्यात आली. 

शुक्रवारी सायंकाळी ज्याेतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी चितेजवळ करण जळालेल्या अवस्थेत काही जणांना दिसून आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला हाेता. ज्याेतीच्या चितेजवळच त्याच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. 

४३० किमी माेटारसायकल चालवून पाेहाेचला गावातज्याेतीच्या मृत्यूची माहिती मिळताच शाेकाकुल झालेला करण तब्बल ४३० किलाेमीटर अंतरावरून माेटरसायकलने शनिवारी सकाळी गावी पाेहाेचला. बहिणीची चिता पाहून दु:खाच्या आवेगात त्याने स्वत:ला त्यात झाेकून दिले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश