शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांनो परत फिरा रे; सेमीकंडक्टर चिपला बळ द्या रे! सरकारला आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 09:54 IST

विदेशातील कंपन्यांमध्ये अनेक भारतीय उच्च पदावर

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्सनंतर आता भारत सरकारचा भर देशाला सेमीकंडक्टर हब बनविण्यावर आहे. विदेशी सेमीकंडक्टर कंपन्यांना देशात आकर्षित करण्यासाठी सरकारने १० अब्ज डॉलर्सच्या इन्सेटिव्हची घोषणा केली आहे. त्यामुळे आशिया आणि अमेरिकेत काम करणारे हजारो भारतीय अभियंते मायदेशी परततील आणि देशातील नवीन हाय-टेक क्रांतीमध्ये सहभागी होतील, अशी सरकारला आशा आहे. 

सेमीकंडक्टर कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारने हा अंदाज वर्तविला आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, जगभरातील सेमी कंडक्टर कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणारे २० ते २५ टक्के हे भारतीय आहेत. त्यापैकी बरेच जण भारतात परततील, अशी आम्हाला आशा आहे.

काय आहेत आव्हाने? जगातील बहुतांश अभियंते हे भारतातून येतात पण त्यांना सेमी कंडक्टर बनवण्याचा अनुभव नाही. त्यामुळे कंपन्यांना जगभरातील अनेक प्रतिभावंतांना भारतात आणावे लागेल आणि येथेही प्रतिभावंत निर्माण करावे लागतील. अनुभवी प्रशिक्षित अभियंत्यांचा अभाव, भारतातील गुंतागुंतीची प्रशासकीय रचना आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या आयातीवरील उच्च शुल्कामुळे तैवानच्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करू शकतात. एक-दोन कंपन्या आल्याने सेमी कंडक्टर क्षेत्राला गती मिळणार ना. आयसी डिझाईन, चाचणी, पॅकेजिंग आणि साहित्य पुरवठा यासह संपूर्ण पुरवठा साखळी भारतात यावी लागेल, तरच या क्षेत्रात भारताला यश मिळेल.