शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आठ मुलींनंतर 82 व्या वर्षी पीठाधिपतींना झाला मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:23 IST

उत्तर कर्नाटकातील एका मठाच्या पीठाधिपतींना वयाच्या 82 व्या वर्षी मुलगा झाला आहे.

ठळक मुद्दे उत्तर कर्नाटकातील एका मठाच्या पीठाधिपतींना वयाच्या 82 व्या वर्षी मुलगा झाला आहे.आठ मुलींनंतरच्या मुलाचा बुधवारी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जन्म झाला.

कलबुर्गी- उत्तर कर्नाटकातील एका मठाच्या पीठाधिपतींना वयाच्या 82 व्या वर्षी मुलगा झाला आहे. आठ मुलींनंतरच्या मुलाचा बुधवारी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. पीठाधिपतींचं हे नववं अपत्य आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. शरणबसप्पा अप्पा हे कलबुर्गीतील शरण बसवेश्वर संस्थान या मठाचे पीठाधिपती आहे. शरणबसप्पा यांच्या दुसऱ्या बायकोने बुधवारी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. शरणबसप्पा आणि त्यांच्या पहिल्या बायकोला पाच मुली आहेत तर दुसऱ्या बायकोला तीन मुली असून आता चौथा मुलगा आहे. 

शरणबसप्पा यांचा मुलगा शहरात सध्या चर्चेचा विषय आहे. या नवजात बाळाला पाहण्यासाठी शहरातील लोकांनी मठात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पण मठातील अधिकाऱ्यांनी काही कारण देत लोकांना तेथून परत पाठवलं. शरणबसप्पा अप्पा यांचा पुतण्या लिंगराजप्पा अप्पा यांनी मुलाच्या जन्माने आम्ही सगळे आनंदी असल्याचं सांगितलं. तसंच मुंबईतील हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाल्याचंही त्यांनी म्हंटलं. 

शरणबसप्पा  त्यांच्यानंतर मठाची सूत्र सांभाळण्यासाठी मुलाच्या प्रतिक्षेत होते. मठाची एकुण 100 कोटींची संपत्ती असून त्यासाठी त्यांना वारसदार हवा होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे. कलबुर्गीतील शरण बसवेश्वर मंदिराच्या मालकीचा हा मठ आहे.