शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सबजार अहमद ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये 50 ठिकाणी दगडफेक

By admin | Updated: May 27, 2017 15:01 IST

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद ठार झाल्यानंतर काश्मीर खो-यातील अनेक भागात हिंसाचार सुरु झाल्याचे वृत्त आहे.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 27 - सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद ठार झाल्यानंतर काश्मीर खो-यातील अनेक भागात बंद पाळण्यात येत आहे. अनंतनाग येथे हिंसक आंदोलना दरम्यान एकजण जखमी झाला आहे.  
 
बुरहान वानीची जागा घेणारा सबजार अहमद शनिवारी सकाळी त्राल येथे सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. सबजार अमहद ठार झाल्याची बातमी आल्यानंतर पुलवामातील त्राल आणि अनंतनागमधील खानाबालसह 50 ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. काश्मीर खो-यात तणावाचे वातावरण असून, लोक घराच्या दिशेने पळत आहेत. रस्त्यावर शुकशुकाट आहे. शाळा तीन तास आधी सोडण्यात आल्या. 
 
लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी हे ऑपरेशन केले. सबजार आणि त्याचे साथीदार इमारतीत असल्याचे समजल्यानंतर लष्कराने त्या परिसराला वेढा घातला. ज्यामुळे सबजारला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. 
 
रामपूरमध्ये सहा दहशतवादी ठार 
दरम्यान  जम्मू काश्मीरमधील रामपूर सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. शिवाय, घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या सहा दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले आहे. भारतीय जवानांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.  दरम्यान, या परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. रामपूर सेक्टर हे बारामुल्ला आणि उरी क्षेत्राजवळ आहे. 
 
कोण आहे सबजार अहमद 
- मागच्यावर्षी जुलै महिन्यात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुलचा मोहरक्या बुरहान वानी ठार झाल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली. सब डॉन म्हणून तो काश्मीर खो-यात ओळखला जायचा. 
- सबजार अहमद बुरहान वानीचा विश्वासू साथीदार होता. त्याने दोन वर्ष वानीसोबत काम केले होते. हिजबुल मुजाहिद्दीनच्या संपूर्ण नेटवर्कची त्याला माहिती होती. 
- सबजारचे एका मुलीवर प्रेम होते. तिच्या कुटुंबियांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर सबजार दहशतवादाकडे वळला. 
-  बुरहान वानीचा मोठा भाऊ खालिदची हत्या झाल्यानंतर आंदोलन सुरु असताना सबजारने एका अधिका-याच्या हातून बंदूक हिसकावली होती. त्यानंतर त्याला हिजबुलमध्ये महत्वाचे स्थान मिळाले होते. 
- सबजार अहमदवर 10 लाखाचे इनाम होते.