शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

गुरुमीत राम रहीम यांना दोषीठरविल्यानंतर जाळपोळ, दगडफेक, वाहिन्यांच्या ओबी व्हॅनही पेटवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 06:05 IST

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरूमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर डेरा समर्थक खवळले. त्यांनी चक्क चार राज्यांमध्ये हिंसाचार केला. हरयाणामध्ये याची सर्वाधिक झळ बसली.

पंचकुला/चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरूमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर डेरा समर्थक खवळले. त्यांनी चक्क चार राज्यांमध्ये हिंसाचार केला. हरयाणामध्ये याची सर्वाधिक झळ बसली.राम रहीम यांना दोषी ठरविले जाईल, याची त्यांच्या समर्थकांना जणू आधीच कल्पना असावी. त्यामुळेच न्यायालयाच्या निकालाच्या चार दिवस आधीपासून या समर्थकांची पंचकुला, चंदीगड तसेच सिरसा येथे गर्दी होत होती. राम रहीम दोषी ठरल्यास हे समर्थक धिंगाणा घालतील, हिंसा करतील याचा हरयाणा सरकारला व प्रशासनाला पूर्ण अंदाज होता. निकालावेळी न्यायालयापासून एक किलोमीटर अंतरावर दोन लाख समर्थक होते. सिरसा येथून पंचकुला येथील न्यायालयात सुनावणीसाठी ते त्यांच्या २00 वाहनांच्या ताफ्यासोबत आले.सव्वादोन वाजता न्या. जगदीप सिंह यांनी निकाल वाचायला सुरुवात केली. तेव्हा राम रहीम हात जोडून पिंजºयात उभे होते. बाहेर समर्थकांचे लक्ष निकालाकडे लागले होते. बरोबर दोन वाजून ५८ मिनिटांनी न्यायाधीशांनी राम रहीम बलात्कार खटल्यात दोषी असल्याचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर अवघ्या १0 मिनिटांतच पंचकुलामध्ये दगडफेक सुरू झाली. पोलीस त्यांना रोखायला गेले, तर दगड त्यांच्यावरच पडू लागले.पोलिसांनी गोळीबार सुरू केला तरी समर्थकांकडून दगड येतच होते. लष्कर तेथून जवळ होते. पण त्याला पाचारण करण्यात आले नव्हते. समर्थकांनी टीव्ही चॅनल्सच्या ओबी व्हॅनवरही दगडफेक केली. तोडफोड केली, त्या उलथवून लावल्या, आग लावली. यात एनडीटीव्हीच्या ड्रायव्हरचा पाय तुटला, इंजिनीअर जखमी झाला, एक पत्रकार पळण्यात यशस्वी झाला, पण त्याची बाइक जाळण्यात आली. चॅनलवाले विरोधी बातम्या देऊ न आपल्या बाबांची बदनामी करतात, असा त्यांचा आरोप होता.दोषी ठरवताच काय घडले?रस्त्यांवर उभी असलेली शेकडो वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागली. सर्वत्र आगीचे लोट आणि प्रचंड धूर दिसू लागला. पंचकुला भागात सर्वत्र आगीचे लोळ उठत होते. धुराचे साम्राज्य शहरभर पसरले होते.हिंसक जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला, पण तरीही जमाव हटेना. मग अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या. डोळ्यात धूर जात होता, डोळ्यांची आग होत होती. पण जमाव हलायलाच तयार नव्हता.मग जमाव रेल्वे स्टेशन्स, टेलिफोन एक्स्चेंज, सरकारी कार्यालये पेटवत सुटला. तेव्हा गोळीबार करण्याखेरीज पर्यायच राहिला नाही.हिंसाचारानंतर नेले रोहतकलाराम रहीम दोषी ठरल्यानंतर लगेच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना आधी अंबालाच्या तुरुंगात नेतील आणि तिथून सोमवारी न्यायालयात उभे करतील, असे सांगण्यात आले. पण नंतर त्यांना चंदीगडमधील लष्कराच्या कार्यालयात नेण्यात आले आणि तेथून संध्याकाळी विशेष हेलिकॉप्टरने रोहतकजवळील सुनरियाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेण्यात आले. त्या केंद्राचे रूपांतर सध्या तुरुंगात करण्यात आले आहे. त्या ठिकाणाला लष्करी छावणीचेच स्वरूप आले आहे.हरयाणा सरकारवर टीका आणि आरोपया सर्व प्रकारांवरून हरयाणा सरकार व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर चोहीकडून टीका सुरू झाली. त्यामुळे पंजाब सरकारने काळजी न घेतल्यामुळेच हा हिंसाचार झाल्याचा आरोप भाजपाने सुरू केला. पंजाबमधील राम रहीमच्या समर्थकांना हरयाणामध्ये जाण्याची परवानगी का दिली, असा सवाल भाजपचे विनोद जोशी यांनी केला. शीख संघटनांनी या हिंसाचाराबद्दल राम रहीम व त्यांच्या समर्थकांवर टीका करतानाच, गुरुद्वारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली.या हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. राम रहीमची मालमत्ता ताब्यात घ्या आणि त्यातून नुकसानाची भरपाई वसूल करा, असे न्यायालयाने म्हटले आहे. असे असताना हरयाणा सरकारने स्वत:हून आम्ही खासगी मालमत्तेचे नुकसान भरून देऊ , असे का जाहीर केले? राम रहीमची मालमत्ता ताब्यात घेतल्यास त्याचे समर्थक आणखी चिडतील, अशी भीती तर सरकारला वाटत नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.कोण हा बाबा?१५ आॅगस्ट १९६७ रोजी बाबा गुरमीत राम रहीम याचा जन्म झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात जन्मालेल्या गुरुमीतचे वयाच्या सातव्या वर्षी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी ‘राम रहीम’ असे नाव ठेवले. शाह सतनाम सिंह यांनी १९९० मध्ये एका सत्संगात गुरमीत राम रहीम सिंहला आपला उत्तराधिकारी घोषीत केले. बाबा राम रहीमला दोन मुली आणि एक मुलगा असल्याचे सांगितले जाते.बाबाची हायटेक गुफाराम रहीम यांच्यावर आरोप करणाºया बलात्कार पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात बाबाने रात्री गुफेमध्ये बोलावून दुष्कर्मकेल्याचे तिने म्हटले होते. जवळपास १०० एकर परिसरात पसरलेल्या गुरमीत राम रहीम यांच्या आश्रमाच्या मधोमध काचेचे एक भवन आहे, त्याला बाबाची गुफा असे म्हटले जाते.गुफेमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत. बाबाची गाडी थेट या दरवाजांपर्यंत पोहोचते. गुफेत प्रवेश करताना बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर केला जातो. गुफेच्या रस्त्यात बंदुक घेऊन काही लोक तैनात असतात. बाबाच्या हजारो महिला भाविकांपैकी काही खास भाविकांनाच या गुफेत प्रवेश करण्याचा अधिकार आहे. या महिला भाविक साध्वीसारख्या वेशभूषेत असतात. बाबाला जेवण भरवण्यापासून सकाळ-संध्याकाळ स्टेजवर नेण्या-आणण्याचे काम या महिला भाविक करतात. बाबाच्या प्रवचनाच्या वेळीही यामहिला भाविकांना बसण्याची विशेष सोय असते. प्रवचन हॉलमधील सर्व व्यवस्था या महिला भाविकच सांभाळतात तर हॉलच्या बाहेरील भागात पुरूष कारसेवक काम करतात.बाबाच्या या गुफेत विशेष व्यक्तींची भेट घेण्यासाठी एक रूम आहे. अनेक देशांमध्ये थेट बोलता यावे यासाठी हॉटलाइन आहे. या गुफेत ऐशोआरामाची प्रत्येक वस्तू आहे. बाबाच्या आश्रमात सीसीटीव्ही तर आहेच शिवाय एक कंट्रोल रूम आहे. या रूममध्ये देशातील सर्व चॅनलची मॉनेटरिंग व बाबाशी संबंधित बातम्या रेकॉर्ड करण्याची सिस्टीमही आहे.

टॅग्स :Courtन्यायालय