शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

तामिळनाडू तुझा भाजपावर भरोसा हाय काय ?

By वैभव देसाई | Updated: August 3, 2017 14:40 IST

तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत.5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नई, दि. 3 - देशात भाजपाचा वारू सद्यस्थितीत चौफेर उधळला आहे. पूर्वेपासून ते उत्तर भारतातील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता स्थापन करत दबदबा निर्माण केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ भाजपानं नितीश कुमारांच्या मदतीनं बिहारमध्ये सत्ता काबिज केली. त्यानंतर भाजपानं आता दक्षिण भारताकडे मोर्चा वळवला आहे. तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून आधीच निवृत्ती घेतली आहे. तर जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील जनतेमध्ये चांगली प्रतिमा असलेला सद्यस्थितीत एकही नेता नाही. त्या मुद्द्याचा फायदा उठवत भाजपानं तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याची योजना आखली आहे. 2016च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अमित शाह यांनी नवी रणनीती तयार केली आहे. भाजपानं तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपानं पक्षाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत. तर इतर 5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय राजकारणात देखील तशी चर्चा सुरू झाली आहे. AIADMKच्या माध्यमातून भाजपाला तामिळनाडूमध्ये वर्चस्व निर्माण करायचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाचे वरिष्ठ नेता व केंद्रीय मंत्री यासंबंधी AIADMK नेत्यांसोबत बोलणी करतायत. त्यामुळे AIADMK हा एनडीएचा हिस्सा बनल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पूर्व आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता हस्तगत केली आहे. मात्र दक्षिण भारतात भाजपा सत्तेपासून अद्यापही दूर आहे. उत्तर व मध्य भारतातील राज्यांमध्ये भाजपाने आपला झेंडा फडकावल्यानंतर आता भाजपानं दक्षिण भारतावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. अशात तामिळनाडूतील AIADMK हा पक्ष भाजपासाठी सर्वाधिक चांगला व सोयीस्कर पर्याय असल्याचे मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील सत्तेत संघर्ष सुरू आहे. त्यांचा पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांच्याकडे सत्तेच्या चाव्या जातील, अशी शक्यता होती. मात्र बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर ई. पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनी आधीच बंड पुकारले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीचा लाभ उठवण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या कारणांमुळेच रखडल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता असून, या मंत्रिमंडळ विस्तारात AIADMK चाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीएची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ताराष्ट्रीय लोकशाही आघाडीची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ता आहे. नितीश कुमार यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेले 48 पक्ष 30 राज्यांपैकी 18 राज्यांत सत्तेवर आहे.  मात्र 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993मध्ये यूपीएची अनेक राज्यांत सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसची जवळपास 15 राज्यांत सत्ता होती. तर एका राज्यांत काँग्रेस सहयोगी पक्षासोबत सत्तेत होती.  कमल हसन आणि रजनीकांत करणार राजकारणात प्रवेशतामिळनाडूच्या राजकारणात कमल हसन आणि सुपरस्टार रजनीकांतही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा लवकरच राजकारणात प्रवेशाची घोषणा करू शकतो, अशी माहिती त्यांचे बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी तामिळनाडूतील जनतेची इच्छा आहे. चाहते आणि हितचिंतकांशी चर्चेची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केल्याचंही समजतंय. तामिळनाडूचे नेतृत्व करण्यासाठी तमीळ व्यक्तीच का हवी? असा प्रश्‍न उपस्थित करीत अभिनेता कमल हसन याने अप्रत्यक्षपणे सुपरस्टार रजनीकांत याचे समर्थन केले होते. तामिळनाडूचे नेतृत्व तमीळ व्यक्तीनेच करावे का? असा प्रश्‍न कमल हसन यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले होते.