शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाकची आगळीक रोखण्यासाठी सीमेवर लष्कर बनवणार एअर डिफेन्स युनिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:37 IST

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्लीः गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. लष्कराचं हे एअर डिफेन्स युनिट पाककडून होणाऱ्या आगळिकीला उत्तर देण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेला घेरा बंदी करण्याच्या दृष्टीनं लष्कराची तुकडी आणि एअर डिफेन्स युनिट तैनात करण्यात येणार आहे.या एअर डिफेन्स युनिटमुळे पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांना लागलीच चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. एअर डिफेन्स सिस्टीम जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, राजस्थानला लागून असलेल्या पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात येणार आहे. शत्रू राष्ट्रांकडून होत असलेले हवाई हल्ले रोखण्याची यात ताकद आहे. हे एअर डिफेन्स युनिट आकाश मिसाइल्स आणि रशियन क्वादार्ट सिस्टीमनं बनवण्यात आलं आहे. तसेच लवकरच यात लष्कराला इस्रायल आणि डीआरडीओनं बनवलेल्या MR-SAM डिफेन्स सिस्टीमही मिळणार आहे.  14 फेब्रुवारीला पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत पलटवार करणार या भीतीने पाकिस्तानने सीमेवर विशेष सैन्य तैनात केले होते.जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जम्मू-श्रीनगर राज्यमार्गावरून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पाकिस्तानने आक्रमक दल 1 आणि दोन या पथकांना माघारी बोलावले नव्हते. यामुळे शकरगडमध्येही तैनात केलेले रणगाडे चिंतेचा विषय बनले आहेत.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल