शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘खून’ केलेल्या पत्नीला त्याने ७ वर्षांनी शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:10 IST

गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!

केंद्रपाडा (ओदिशा) : पतकुरा गावातील अभय सुतार याच्यावर पत्नी इतिश्री हिचा खून केल्याबद्दल खटला दाखल केला गेला. सात वर्षांपूर्वी महिनाभर तुरुंगात राहिल्यावर त्याची जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून त्याने ‘खून’ झालेल्या पत्नीला शोधून काढण्याचा ध्यास घेतला होता. गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!चौलिया गावातील अभयचा जवळच्याच समागोला गावातील इतिश्री हिच्याशी विवाह झाला. जेमतेम दोन महिने सासरी राहिल्यावर इतिश्री अचानक घरातून निघून गेली. थोडे दिवस शोध करून अभयने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली. दुसरीकडे इतिश्रीच्या वडिलांनी सुरुवातीला तिचा सासरी छळ होत असल्याची व नंतर अभयने तिचा खून करून मृतदेह कुठेतरी टाकून दिल्याची फिर्याद नोंदविली. याच फिर्यादीवरून अभयवर खुनाचा खटला दाखल झाला.अखेर पुरी जिल्ह्याच्या पिपली गावात अभयला इतिश्री सापडली आणि सात वर्षांचा त्याचा संशय खरा ठरला. इतिश्री राजीव लोचन मोहराना या तिच्या प्रियकरासोबत होती.इतिश्रीने न्यायालयात दिलेल्या जबानीने तिच्या सात वर्षे गायब होण्याचा उलगडा झाला. अभयशी लग्न होण्याआधीपासून इतिश्री व राजीव लोचन यांचे प्रेमसंबंध होते; पण घरच्यांनी तिचे अभयशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. एक दिवस संधी साधून ती सासरच्या घरातून रात्री गुपचूप बाहेर पडली. राजीव लोचनशी तिने पळून जाऊन लग्न केले. दोघे सात वर्षे गुजरातमध्ये राहिले. या दरम्यान त्यांना दोन मुलेही झाली. आता सर्व सामसूम झाले असेल, असे समजून दोघेही मुलांना घेऊन पुन्हा ओदिशात आले व पिपली गावात राहू लागले. राजीव लोचन भुवनेश्वरमध्ये रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका चालवितो. (वृत्तसंस्था)>निर्दोष ठरल्याचे समाधानअभय म्हणतो, माझा इतिश्रीवर राग नाही. तिने मला आधी सांगितले असते तर मी तिच्याशी लग्न केलेही नसते. इतिश्रीचा खून झालेला नाही, या माझ्या सांगण्यावर कोणी विश्वासही ठेवायला तयार नव्हते.शेवटी जामिनावर सुटून बाहेर आल्यावर मीच तिला शोधण्याचे ठरविले. ती सापडली आणि मी निर्दोष ठरलो, याचेच मला समाधान आहे.