शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात 20 वर्षांनंतर हिंदू खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 12:11 IST

पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या कॅबिनेटने शुक्रवारी शपथ घेतली.

ठळक मुद्दे पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या कॅबिनेटने शुक्रवारी शपथ घेतली. मंत्रिमंडळात खासदार दर्शन लाल या हिंदू खासदाराचाही समावेश करण्यात आला आहे मागील २० वर्षांहून जास्त काळानंतर पहिल्यांदात एका हिंदू नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

इस्लामाबाद, दि. 5- बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं. तसंच नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरुनही हटवण्यात आलं. नवाज शरीफ यांच्यानंतर शाहिद खाकन अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आली. पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या कॅबिनेटने शुक्रवारी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात खासदार दर्शन लाल या हिंदू खासदाराचाही समावेश करण्यात आला आहे. मागील २० वर्षांहून जास्त काळानंतर पहिल्यांदात एका हिंदू नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी ४७ खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 19 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर 28 केंद्रिय मंत्र्यांचा समावेश आहे. 

दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चारही प्रांताच्या समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.  ६५ वर्षीय लाल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. वर्ष २०१३ मध्ये ते पीएमएल-एन पक्षाकडून अल्पसंख्यांक कोट्यातून दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले होते.तर नवाझ शरीफ यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण आणि ऊर्जा मंत्रालय सांभाळणाऱ्या ख्वाजा आसिफ यांची अब्बासींनी विदेश मंत्री म्हणून निवड केली आहे. पाकिस्तान सरकारला वर्ष २०१३ नंतर प्रथमच पूर्णवेळ विदेश मंत्री मिळाला आहे. पाकिस्तानच्या शेवटच्या विदेश मंत्री या हिना रब्बानी खार होत्या.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना मागील आठवड्यात पनामा पेपर्स भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदावरूनही पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शरीफ यांचे निकटवर्तीय शाहिद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधानपदी वर्णी लावण्यात आली होती. पण, अब्बासी यांना पुढील १० महिन्यांसाठी पंतप्रधानपदी नियुक्त केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.