वकिलांचे आंदोलन सुरूच
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीसाठी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती व पुणे बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी सहाव्या दिवशीही आंदोलन केले. जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. मागील पाच दिवसांपासून वकिल तसेच शहरातील विविध पक्ष, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होत आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वकिलांनी खंडपीठाच्या घोषणा देत नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. सहाव्या दिवशीही शहरातील लोकप्रतिनिधी तसेच पालकमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे विद्यापीठ चौकात आंदोलन केले जाणार आहे.
वकिलांचे आंदोलन सुरूच
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीसाठी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती व पुणे बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी सहाव्या दिवशीही आंदोलन केले. जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. मागील पाच दिवसांपासून वकिल तसेच शहरातील विविध पक्ष, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होत आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वकिलांनी खंडपीठाच्या घोषणा देत नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. सहाव्या दिवशीही शहरातील लोकप्रतिनिधी तसेच पालकमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे विद्यापीठ चौकात आंदोलन केले जाणार आहे.---------फोटो - एमराजानंद - वकिल आंदोलनफोटोओळ - पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती व पुणे बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी सहाव्या दिवशी जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.-------------