शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १८ कोटी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा केंद्राचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 03:04 IST

एम्सचा वार्धक्यशास्त्र विभाग : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाकडूनही मार्गदर्शन

मुंबई/औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय व नवी दिल्ली येथील एम्सच्या वार्धक्यशास्त्र विभागाने सोमवारी कोविड -१९ महामारीच्या साथीमध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली. संकटाच्या या काळात सुरक्षित कसे राहावे. त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे यात निश्चित केली. मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रह्मण्यम यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सर्व जिल्ह्यांत या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यास सांगितले आहे.

या पत्रात म्हटल्यानुसार, २०११ च्या जनगणनेच्या वयोगटाच्या आकडेवारीनुसार देशात अंदाजे १६ कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. ६० ते ६९ वयोगटात ८ कोटी ८० लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. ७० ते ७९ मध्ये ६ कोटी ४० लाख, तर काळजीवाहूंची गरज असलेल्या (ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे) नागरिकांची संख्या २ कोटी ८० लाख आहे. देशात निराधार किंवा कुटुंब सांभाळत नसलेल्या ज्येष्ठांची संख्या १८ लाख आहे. असे देशात एकूण १८ कोटी १८ लाख ज्येष्ठ आहेत. या नागरिकांना कोविड-१९ च्या काळात धोका अधिक वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे काळजीवाहू यांच्यासाठी दिलेली ही अ‍ॅडव्हायझरी या काळात त्यांचा धोका कमी करण्यात उपयोगी पडणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.हे कोणासाठीआहे?च्६० वर्षे व त्याहून अधिक, विशेषत: उपरोक्त वैद्यकीय स्थिती असलेलेच्दमा, श्वसनात तीव्र अडथळ््यांचे दीर्घकालीन श्वसन रोगच्फुफ्फुसाचे आजार (सीओपीडी), ब्रॉन्काइकेटेसिस,च्तीव्र हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोगच्मूत्रपिंडाचा आजार, अल्कोहोलिक आजारच्व्हायरल हिपॅटायटिससारखा तीव्र यकृत रोगच्पार्किन्सन, स्ट्रोकसारखी तीव्र न्यूरोलॉजिकल स्थितीहे करासंपूर्ण वेळ घरात राहून अभ्यागतांना भेटणे टाळाकोणालाही भेटताना एक मीटर अंतर पाळाएकटेच राहत असल्यास निरोगी काळजीवाहू निवडाकोणत्याही परिस्थितीत लहान, मोठी संमेलने पूर्णपणे टाळाघरात असताना मोबाईल जवळ ठेवाघरीच हलका व्यायाम आणि योग करण्याचा विचार कराजेवण करण्यापूर्वी, वॉशरूम वापरल्यानंतर वीस सेकंद हात धुवामोबाईल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीवारंवार स्पर्श केलेला चष्मा, मोबाईल, काठी आदी वस्तू स्वच्छ कराशिंंकताना- खोकताना टिशू पेपर किंवा रुमालाचा वापर कराघरी शिजवलेले ताजे गरम जेवण घ्यारोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रस प्यादररोज लिहून दिलेली औषधे नियमितपणे घ्याताप, खोकला, श्वासास अडचणी आल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधाशक्यतो डॉक्टरांशी फोनवर बोलून रुटीन उपचार सुरू ठेवा.आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलानातेवाईक, मित्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगवर बोलाआवश्यक असल्यासकुटुंबातील सदस्यांकडून मदत घ्याउन्हाळ््यामुळे, डिहायड्रेशन टाळा. पाण्याचा पुरेसा वापर करा.हे करू नकाताप, सर्दी - खोकला, श्वसन विकार असणाऱ्यांच्या जवळ जाणेमित्र, परिवाराच्या गळाभेटी, हस्तांदोलन, जवळून संपर्कगर्दीची ठिकाणे, उद्याने, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणी जाणेहातावर खोकणे, शिंंकणेडोळे, चेहरा नाकावर वारंवार हात लावणेमनाने औषधोपचार, नियमित चेकअपसाठी रुग्णालयात जाणेनातेवाईकांना घरी बोलावणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार