शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आता वर्षातून दोन वेळा प्रवेश, परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 07:18 IST

Education 2024: परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार आहे

 नवी दिल्ली - परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असून, जुलै-ऑगस्ट  आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा दोन वेळा प्रवेश प्रक्रिया  राबविल्या जातील, अशी माहिती यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी दिली.

भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्यास त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांस झालेला उशीर, आरोग्य समस्या किंवा वैयक्तिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टच्या सत्रात विद्यापीठात प्रवेश घेता आला नाही, त्यांना जानेवारी-फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश घेता येईल. द्विवार्षिक प्रवेशामुळे महाविद्यालयांना मनुष्यबळ, साधनसामग्रीचे नियोजन करता येईल. विविध विद्याशाखा, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि सहायक सेवा अधिक कार्यक्षमतेने देता येईल. परिणामी, विद्यापीठात चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल, असे कुमार म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सहकार्यास मदत जगभरातील विद्यापीठे आधीपासूनच द्विवार्षिक प्रवेश प्रणालीचे पालन करतात. भारतातील संस्थांनी द्विवार्षिक प्रवेश पद्धती स्वीकारल्यास त्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि विद्यार्थी देवाणघेवाण वाढवू शकतात. त्यातून जागतिक स्पर्धात्मकता वाढेल व जागतिक शैक्षणिक मानकांशी जुळवून घेता येईल, असेही कुमार म्हणाले. 

द्विवार्षिक प्रवेश बंधनकारक नाहीविद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांना द्विवार्षिक प्रवेश देणे बंधनकारक असणार नाही. ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि अध्यापन वर्ग आहे, ते या संधीचा उपयोग करू शकतात. ज्यांना उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करायचे आहे, त्यांना ही चांगली संधी आहे, असे कुमार म्हणाले.

वर्षभर वाट पाहावी लागणार नाही द्विवार्षिक विद्यापीठ प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यास मदत होईल. कारण एकदा प्रवेश चुकल्यास त्यांना प्रवेशासाठी आखणी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच उद्योगांना त्यांची कॅम्पस भरती वर्षातून दोनदा करता येईल, त्यामुळे पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, असेही कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय