शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यनाथ यांचे ‘भाजपा’विरोधात बंड?

By admin | Updated: January 29, 2017 00:11 IST

गोरखपूरमधून सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांचा भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून समावेश

लखनऊ : गोरखपूरमधून सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांचा भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून समावेश केल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदू युवा वाहिनी’ या संघटनेने भाजपाविरुद्ध उमेदवार जाहीर करून बंडाचे निशाण उभारले आहे.गोरखनाथ मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा खास करून पूर्व उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. तो लक्षात घेऊनच भाजपाने त्यांना आगामी निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व राजनाथ सिंग यांच्याखेरीज पक्षाने आदित्यनाथ यांनाच प्रचारात उतरविले होते व त्यांना हेलिकॉप्टरही दिले होते.परंतु आदित्यनाथ यांनी सन २००२ मध्ये स्थापन केलेली हिंदु युवा वाहिनी भाजपावर नाराज असून पक्षाने त्यांच्या मातब्बरीच्या तुलनेत स्थान न देऊन आदित्यनाथ यांचा अपमान केला आहे, असा या संघटनेचा आरोप आहे.हिंदु युवा वाहिनीने पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या विरोधात ६४ उमेदवार ‘अपक्ष’ म्हणून उभे करण्याचे ठरविले आहे, असे या वाहिनीचे राज्य प्रमुख सुनील सिंग यांनी सांगितले. कुशीनगर आणि महाराजगंज या दोन जिल्ह्यातील सहा उमेदवारही जाहीर केले. बाकीचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.पक्षाने योगी आदित्यनाथ यांचा कसा अपमान केला याचा पाढा वाचताना सुनील सिंग म्हणाले: योगीजींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी पूर्व उत्तर प्रदेशवासियांची मागणी होती. परंतु पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. (वृत्तसंस्था)पक्षाने मोहिनी घातली!हिंदू युवा वाहिनीने उमेदवार उभे करण्याविषयी योगी आदित्यनाथ यांनी भाष्य करण्यास नकार दिला. संघटनेने हा निर्णय घेण्यापूर्वी आदित्यनाथ यांची संमती घेतली आहे का, असे विचारता सुनिल सिंग यांनी जे उत्तर दिले त्यावरून संमती घेतली नसल्याचे सूचित झाले.