शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

"अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?"; आदित्य ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:02 IST

आदित्य ठाकरे लखनौत उतरताच शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

Aaditya Thackeray Ayodhya Visit : अयोध्या दौरा हा राजकीय नाही तर हा श्रद्धेचा विषय आहे.  प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मी अयोध्येत आलो आहे. ही राजकारणाची नव्हे तर रामराज्याची भूमी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लखनौमधून अयोध्येकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. या मुद्द्यावरून हनुमानगढ़ीचे महंत राजू दास यांनी आदित्य ठाकरेंना कात्रीत पकडणारा प्रश्न विचारला.

आदित्य ठाकरे जेव्हा लखनौ विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून फुलांच्या पायघड्या घालण्याच आल्या आणि त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी कार्यकर्त्यांना पक्षाच्या आणि नेत्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. तसेच शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या प्रकारावरून आदित्य ठाकरेंना सवाल करण्यात आला. "शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणतात की हा राजकीय दौरा नाही. पण मग अयोध्येच्या रस्त्यांवर त्यांची एवढी पोस्टर लागली आहेत. घोषणाबाजी सुरू आहे, त्याचं काय? हिंदुत्वाच्या भूमिके विषयीच्या प्रश्नाचंही उत्तर द्यावं लागेल", असे सवाल हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी आदित्य ठाकरेंना केले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले...

"आम्ही २०१८ मध्ये अयोध्येत आलो होते तेव्हा 'आधी मंदिर, मग सरकार' असं म्हणालो होतो. त्यानुसार आता मी आज आशीर्वाद घ्यायला आणि प्रार्थना करायला आलो आहे. ही भूमी राजकीय आखाड्याची नाही. ही रामराज्याची भूमी आहे. त्यामुळे येथील मंदिरात गेल्यावर मी कोणतेही मागणे मागण्यापेक्षा आशीर्वाद घेतो आणि मला जे काही देवाने दिले आहे किंवा सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी देवाचे धन्यवाद मानतो. आमचे राजकारण समाजकार्यासाठी असते. आमच्या हातून चांगेल कार्य व्हावे, अशी प्रार्थना करत असतो. त्यामुळे हा राजकीय दौरा नसून श्रद्धेचा विषय आहे", अशी आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याShiv Senaशिवसेना