अतिक्रमण कारवाई जोड...
By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST
महिलेने केला विरोध
अतिक्रमण कारवाई जोड...
महिलेने केला विरोधसकाळी ११ वाजता अतिक्रमण विभागाचे पथकाने प्रथम चित्रा चौक ते शिवाजी पुतळा या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. या मार्गावरील अतिक्रमणे काढत असताना अंतरिक्ष भुवन समोरील एका फुल विक्रेत्या महिलेचा रस्त्यात आलेला ओटा काढत असताना या महिलेने विरोध केला. तेथे असलेल्या पोलिसांनी या महिलेस समजावून सांगितल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली. गोलाणी मार्केटनजीक फळे विक्रेते तसेच भिंतीला लागून असलेल्या टपरीधारकांना टपर्या हटविण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. दुसर्या मार्गावरही विरोधत्यानंतर गोविंदा रिक्षा स्टॉप ते रेल्वे स्टेशन या मार्गावरील अतिक्रमण काढण्यास दुपारी १२.३० नंतर सुरुवात झाली. या मार्गावरील अतिक्रमण धारकांनाही समज देऊन तेथील गाड्या हटविण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. या ठिकाणीही काही हॉकर्सने कारवाईस विरोध केला. त्यांनाही पोलिसांनी समज दिली. या भागात लावण्यात आलेल्या पाच लोटगाड्या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या. या शिवाय रस्त्यावर असलेल्या गाड्यांवरील शेगड्या, स्टूल, टेबल असे साहित्यही जप्त करण्यात आले. शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने या कारवाईस बंदोबस्त दिला. -----अधिकार्यांनी घेतली माहितीविविध भागात कारवाई केली जात असताना उपायुक्त प्रदीप जगताप हे कारवाई करणार्या पथकाच्या संपर्कात होते. सर्व अतिक्रमणे नियमानुसार काढली जावीत अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. -----मोबाईल केले स्विच ऑफबर्याच वेळेस कारवाई करत असताना नगरसेवक किंवा राजकीय व्यक्तींकडून कारवाई करणार्यांवर दबाव येत असल्याच्या घटना घडतात. जप्त केलेल्या गाड्याही सोडून देण्याचे आदेश केले जातात. हे लक्षात घेऊन कारवाई काळात अतिक्रमण विभागातील अधिकार्यांना व कर्मचार्यांना त्यांचे मोबाईल बंद करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.