शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समूहाने केला ५० हजार कोटींचा घोटाळा : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:08 IST

५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

शीलेश शर्मा।नवी दिल्ली : प्रत्यक्ष व्यवसाय न करणाºया कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाने एकाच फटक्यात ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वादही आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी येथे केला.पक्षाचे नेते अजय माकन म्हणाले की, महसूल गुप्तचर विभागाच्या ९७ पानांच्या अहवालात अदानी समूहाने बनावट कंपन्यांच्या मदतीने वीज सयंत्रांची खरेदी चीन आणि कोरियातून करून ती थेट भारतात पाठवली, परंतु त्याची बिले व इतर दस्तावेजांत ही खरेदी संयुक्त अरब अमिरातची कंपनी इलेक्ट्रोजन इन्फ्रा एफझेडईकडून केल्याचे दाखवले. संयुक्त अरब अमिरातची ही बनावट कंपनी अदानी यांनीच घोटोळे करण्यासाठीच स्थापन केली होती. या सगळ््या प्रकाराची केंद्रीय गुप्तचर खात्याकडून (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे.>अहवाल का दडपला?माकन म्हणाले की, पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचारविरोधाच्या गप्पा करतात. मग फेब्रुवारी, २०१३ मध्ये यूपीए सरकारने जी चौकशी सुरू केली व त्याचा जो अहवाल दाखल झाला, तो दडपून का टाकला जात आहे? माकन यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली. या भ्रष्टाचाराचा थेट फटका वीजग्राहकांना बसला आहे, असे सांगून, अदानी समूहाकडून जेथे कोठे वीजपुरवठा केला जात आहे. तेथील विजेचा दर युनिटमागे दोन रुपयांनी कमी केला जावा, अशी मागणी माकन यांनी केली.>आरोप खोटे; कंपनीचा खुलासाअजय माकन यांनी केलेल्या आरोपांचा अदानी समूहाने पत्रकाद्वारे इन्कार केला आहे. हे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत, त्यात तथ्य नाही आणि सर्व नियम व नियामक संस्थांच्या आधीन राहून आम्ही सर्व व्यवहार केले आहेत, महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या चौकशीत आम्ही पूर्णपणे सहकार्य केले होते, असे समूहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मात्र, चौकशीच्या अहवालाविषयी प्रवक्त्याने कोणतेही भाष्य केलेले नाही.