शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सोनू सूद आता मतदानाबद्दल जनजागृती करणार; पंजाबसाठी 'आयकॉन' म्हणून निवड

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 23:11 IST

पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून मंजूर

चंदिगढ: सामाजिक कार्यामुळे सातत्यानं चर्चेत असलेल्या अभिनेता सोनू सूदचीभारतीय निवडणूक आयोगानं पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून निवड केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू यांनी याबद्दलची माहिती दिली. पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सूद यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. त्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे.जनतेमध्ये मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचं काम सोनू सूद पंजाबमधील निवडणूक कार्यालयाच्या मदतीनं करेल. सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गरजवंतांना मदत करत आहे. त्याच्या याच कार्याचा विचार करून स्टेट आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आली. सोनू पंजाबच्या मोगा जिल्ह्याचा मूळ रहिवाशी आहे. त्यानं आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.कोरोना काळात सोनू सूद देशाच्या विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या प्रवासी मजुरांना मोलाची मदत केली. शेकडो मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था सोनूनं स्वखर्चानं केली. त्यामुळे समाजाच्या सर्वच स्तरातून त्याचं कौतुक झालं. आताच्या घडीलाही सोनू अनेक गरजूंना मदतीचा हात देतो. कोरोना संकट काळात शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यासाठी सोनूनं काही दिवसांपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले.

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग