ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - अभिनेता अश्रफ उल हकचे रक्ताच्या आजाराने निधन झाले.
फुकरे, ट्राफिक सिग्नल, पान सिंग तोमार इत्यादी चित्रपटांतून उल्लेखनीय भुमिका साकारणारे अश्रफ गेले तीन दिवस व्हेंटिलेटरवर असल्याचे त्यांचे मित्र दौलत वैद्य यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. आसाम येथे जन्मलेल्या अश्रफ यांनी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून पदवी शिक्षण घेतले होते. चित्रपटात येण्यापूर्वी राम गोपाल बजाज यांच्या नाटकांत त्यांनी अनेक वर्ष अभिनय केला. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'द लॉस्ट बेहरुपीया ' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातली अश्रफ यांची भुमिका अखेरची ठरली.