शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

या अभिनेत्यावर गायिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप

By admin | Updated: March 5, 2017 17:58 IST

कोलावरी डी या गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेला अभिनेता धनुषवर एका गायिकेने लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - कोलावरी डी या गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेला अभिनेता धनुष एका गायिकेने लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावाई असलेल्या धनुष्यच्या आडचणीत दिवसेंदिवस अडचणी वाढतचं आहेत. धनुष हा आपला हरवलेला मुलगा आहे, असा दावा एका वृद्ध दांम्पत्याने केला आहे. यामुळे धनुषला कोर्टाच्या खेटा घालाव्या लागत आहेत. त्यातच आता त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.कॉलिवूडमधिल प्रसिद्ध गायिका सुचित्रा कार्तिक हिने अभिनेता धनुष आणि अनिरुद्ध यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा आरोप केला आहे. हा आरोप तिने सोशल मीडियावर ट्विट करत केला आहे. धनुष आणि अनिरुद्धशिवाय अन्य मोठ्या स्टार्सवरही तिने आरोप केले आहेत. ट्विटनंतर चाहत्यांनी तिच्यावर घणाघाती टीका करत फैलावर घेतले. यानंतर सुचित्राने सर्व पोस्ट डिलीट करत आपले अकांऊट हॅक झाल्याच्या बातम्या झळकल्या. दरम्यान, सुचित्राने धनुष आणि अनिरुद्ध यांनी मला फक्त ड्रग्सच दिले नाही, तर माझे लैंगिक शोषणही केले, असा खळबळजनक आरोप केला. या पोस्टमध्ये सुचित्राने धनुष आणि अनिरूद्धसोबतचे काही आपत्तीजनक फोटो पोस्ट केले. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर सुचित्राने ट्विटरवर एक पोस्ट टाकली. यात तिने हा गंभीर आरोप केला. धनुषच्या चाहत्यांकडून मी ट्रोल होत आहे. पण या चाहत्यांच्या हिरोने माझ्यासोबत काय केले ते पाहा, असे लिहित तिने एक फोटो पोस्ट केला.

या फोटोत सुचित्राच्या हातावर जखम दिसतेय. सुचित्राच्या हातावरची ही जखम खूप काही सांगणारी असली तरी काही वेळातच तिचा हा फोटो अन् सगळ्या पोस्ट डिलिट करण्यात आल्या. यानंतर काही वेळात सुचित्राचे अकाऊंट हॅक झाल्याची बातमी आली.मीडियाने याबाबत सुचित्राला विचारले असता, तिने मात्र अकाऊंट हॅक झाल्याचा इन्कार केला. माझे अकाऊंट हॅक वगैरे झालेले नव्हते. मी स्वत: त्या पोस्ट केल्यात, असे ती म्हणाली.

मात्र, सुचित्राच्या पतीने मात्र वेगळीच स्टोरी सांगितली. तिच्या पतीने या संपूर्ण प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली. शिवाय सुचित्राचे अकाऊंट खरोखरच हॅक झाले होते. ती सध्या डिप्रेशनमध्ये आहे, असे त्याने स्पष्ट केले.