शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य

By पूनम अपराज | Updated: December 26, 2020 19:55 IST

Love Jihad : ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.

ठळक मुद्देपुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.

मध्य प्रदेशनेहीलव्ह जिहादसंदर्भात नवा कायदा बनविला आहे. मध्य प्रदेशात त्याला शिवराज यांच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मध्य प्रदेशच्या नवीन कायद्यात १९ तरतुदी आहेत. नव्या कायद्याबद्दल आज तकशी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले आहेत की, आम्ही मध्य प्रदेशात देशातील सर्वात मोठा कायदा बनविला आहे. ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.नरोत्तम मिश्रा म्हणाले की, या कायद्यात दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा विवाहसोहळ्यांना प्रोत्साहित करणार्‍या संस्थांची नोंदणी रद्द केली जाईल. पुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणाले की, या प्रकरणी तपास ठाणेदार किंवा त्याच्यापेक्षा उच्च स्थरीय दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.  धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020  मध्ये 25 आणि 50 हजार, एक लाख रुपयांच्या दंड रकमेचे तीन टप्प्यांत दंड लावण्यात आला आहे.  दंडाची रक्कम इतकी जास्त का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, भीती निर्माण व्हावी म्हणून रक्कम वाढवली आहे. यूपी कायद्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही कोणाशीही तुलना करत नाही. हा देशातील सर्वात कठोर कायदा आहे. सरकार या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल.नरोत्तम मिश्रा म्हणाले की, देशातील कोणत्याही राज्यातील कोणतेही सरकार असा कायदा आणल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. पुढे ते म्हणाले की, जे लोक कोणत्याही धर्मातील मुलीला मोहात पाडून त्याचे धर्मांतर करून लग्न करतात त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. या विधेयकाद्वारे धर्म स्वातंत्र्य विधेयक 1968 निष्क्रिय मानले जाईल. लव्ह जिहादसंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, कोण काय म्हणतो, हा वेगळा विषय आहे. जो कोणी एखाद्याशी भुरळ घालून, जबरदस्तीने किंवा नशाच्या अवस्थेत एखाद्याशी लग्न करेल तो शिक्षेस पात्र ठरेल.

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादMadhya Pradeshमध्य प्रदेशHome Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिस