शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

लग्नात डी.जे.वाजविला तर कारवाई

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

फोटो

फोटो
जळगाव: सर्वोच्च न्यायालयाने डी.जे.वाद्यावर बंदी घातली आहे, तरीही लग्न समारंभात डी.जे.चा वापर होत असल्याच्या तक्रारी येवू लागल्या आहेत. लग्नात अथवा कोणत्याही कार्यक्रमात डी.जे.वाजविला तर मालकासह मंगल कार्यालय व्यवस्थापक व आयोजकावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिला आहे. रविवारी सकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशनला डी.जे.चालक, मंगल कार्यालय व बॅँडमालकांची बैठक घेण्यात आली.
सध्या लग्न सराई सुरु झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंगल कार्यालय मालकांनी सभागृह व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, सुरक्षा रक्षक नेमावेत, पार्कींगसाठी स्वतंत्र सुविधा करावी, वाद्य वाजविण्याबाबत पोलीस स्टेशनची पुर्व परवानगी घेतल्याशिवाय सभागृह ताब्यात देवू नये आदी सूचनांचे पालन करणे आवश्यक असून त्याची अमलबजावणी झाली नाही तर मंगल कार्यालयाची नोंदणी रद्द करण्यासह बॅँड चालक व आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा वाडीले यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना
शांतता क्षेत्रात वाद्य, वाजंत्री वाजविल्यास वाद्य सामुग्री जप्त करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. कोणत्याही मंगल कार्यालयात रात्री दहा वाजेनंतर वाद्य वाजता कामा नये तसेच ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे पालक करावे, अशा सूचनाही वाडीले यांनी यावेळी दिल्या. शहरातील विविध रुग्णालय,शाळा, महाविद्यालय शासकीय कार्यालय आदी परिसर मनपाच्यावतीने शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत याची जाणीव यावेळी करुन देण्यात आली. बैठकीला सहायक निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गुन्हे शाखेचे प्रदीप चौधरी, शरद पाटील, राजेश पाटील व कर्मचारी उपस्थित होते.