शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक आयुक्तांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: August 1, 2015 00:19 IST

वसुलीची जबाबदारी : अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा

वसुलीची जबाबदारी : अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विकास कामासाठी पैसा नसल्याने नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे गेल्या तीन दिवसापासून झोननिहाय मालमत्ता कराच्या वसुलीचा आढावा घेत आहे. शुक्रवारी आशीनगर व मंडळवारी झोनच्या आढावा बैठकीत वसुलीचे उद्दीष्ट न गाठल्यास कर निरीक्षक व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
आशीनगर झोनची वसुली सर्वात कमी आहे. बहुसंख्य नागरिकांना मालमत्ता करात पाण्याचे बील जोडून पाठविण्यात आले आहे. पाण्याची देयके स्वतंत्र दिली जात असताना मालमत्ता करातही याचा समावेश असल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. यात सुधारणा करून १५ दिवसात नवीन देयके पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सर्व मालमत्ताधारकांना देयके पाठविण्यात आलेली नाही. याचाही वसुलीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंद क रण्यात येईल. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आशीनगर व मंगळवारी झोनच्या बैठकीला कर व कर आकारणी समितीचे सभापती गिरीश देशमुख, झोन सभापती इशरत नाहीद, राजू थूल, सरस्वती सलामे, मुरली मेश्राम, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहाय्यक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमने यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)