शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या देशांना विश्वासात घेऊनच पाकमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:26 IST

विजय गोखलेंवर होती जबाबदारी हवाई हल्ल्यानंतर सर्वांना दिली माहिती

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबरपख्तूनस्थित बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक-२ करायच्या आधी भारताने जगातील जवळपास सगळ्या देशांना अशा प्रकारच्या कारवाईचे संकेत देत त्यांना विश्वासात घेतले होते. ही जबाबदारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी स्वत: सांभाळली होती. याच कारणामुळे कारवाईनंतर परराष्ट्र मंत्रालयाने जगातील सगळ्या देशांना या कारवाईचे सविस्तर विवरण दिले.

नवी दिल्लीतील सर्व प्रमुख देशांचे राजदूत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एअर स्ट्राइकची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने म्हटले की, जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) पुलवामा हल्ल्याची निंदा केली, तेव्हाच आमच्या कारवाईला जगाचा पाठिंबा मिळाला होता. यूएनएससीने आपल्या संदेशात जगातील प्रत्येक देशाला पुलवामा हल्ल्याचा कट रचणाºया जैश-ए-मोहम्मदविरुद्धच्या कारवाईत भारताला सक्रिय मदत करावी, असे आवाहन निवेदनात केले होते. पाकिस्तानचा मित्र चीननेदेखील यूएनएससीच्या निवेदनावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतरच भारताने एअर स्ट्राइकसाठी जगातील सगळ्या देशांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली होती. या निवेदनावरून आमच्या हे लक्षात आले की, पाकिस्तानच्या दहशतवादामुळे जगही त्रासून गेले आहे आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची हीच वेळ आहे.पाकची विनंती गेली वायापाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कसुरी यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सचिवांना पत्र लिहून म्हटले होते की, पुलवामा हल्ल्यानंतर भारत आमच्या देशावर हल्ल्याची तयारी करीत आहे, त्याला थांबवावे. या पत्रावर संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल केला, तसेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळ पाकिस्तानने स्वत: नष्ट करावेत, असेही सांगण्यात आले. जगालाही दहशतवाद्यांचे तळ नष्ट व्हावेत, असे वाटते, हा आमच्यासाठी शुभसंकेत होता. त्यानंतर, आम्ही जगाला विश्वासात घेऊन एअर स्ट्राइकची तयारी सुरू केली, असे हा अधिकारी म्हणाला.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक