शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

बनावट कागदपत्रांद्वारे आरोपीचा जामीन

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

बोगस कागदपत्राद्वारे आरोपीचा जामीन

बोगस कागदपत्राद्वारे आरोपीचा जामीन
गुन्हा दाखल : कामठी येथील प्रकार
कामठी : नागपूर तहसील कार्यालयातून बोगस सॉल्व्हन्सी तयार करून ती आरोपीच्या जामिनासाठी कामठी येथील न्यायालयात सादर करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच कामठी पोलिसांनी न्यायालयाचे प्रभारी सहायक अधीक्षक विनोद आगलावे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
आरोपी आकाश ठाकूर याच्याविरोधात कामठी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. कामठी येथील न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याचा जामीन घेण्यासाठी मथुरा बाबूलाल तिवारी याने नागपूर तहसील कार्यालयातून सॉल्व्हन्सी तयार केली आणि ती कामठी येथील न्यायालयात २ जुलै रोजी सादर केली. न्यायालयाचे प्रभारी सहायक अधीक्षक आगलावे यांना शंका आल्याने त्यांनी या सॉल्व्हन्सीबाबत कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पडताळणी करण्याची सूचना केली. चौकशीअंती ती बोगस असल्याचे स्पष्ट होताच आगलावे यांनी मथुरा तिवारी, रा. नागपूर याच्याविरोधात कामठी पेालीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४६९, १९३, १९८ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी मथुरा तिवारी याचा शोध घेणे सुरू केले आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चौगावकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
***